कोळसा घोटाळ्याबाबत कोणी काहीही म्हणत असले तरीही सरकारला काहीही लपवायचे नाही, कोळसा खाणींचे वाटप राज्य सरकारांनी केलेल्या शिफारशींवरूनच करण्यात आले आहे, असे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायणसामी यांनी स्पष्ट केले. संबंधित राज्यांचे मुख्य सचिव हे खाण वाटप समितीचे सदस्य असतात, त्या समितीने परवानगी दिल्यानंतरच वाटप केले जाते, असे ते म्हणाले. बिर्ला, पारख यांच्याबाबत आताच काही बोलणे अनुचित ठरेल, असेही त्यांनी सांगितले.