गेल्या काही वर्षात वीजेची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. कोळशाचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने देशात अनेकदा वीज टंचाईची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे कोळसा आयात करावा लागायचा. मात्र, आता दिलासा दोणारी बातमी समोर आली असून मागील काही महिन्यांपासून भारतात कोळशाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. भारताने कोळसा उत्पादनात १ अब्ज टनाचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे कोळसा आयातीवरचे अवलंबित्व कमी होणार आहे.

भारत हा जगातील कोळसा उत्पादक देशांपैकी एक आहे. २०२०-२१ मध्ये कोळशाचे उत्पादन ७१६.०८ दशलक्ष मेट्रिक टन होते. त्यानंतर आता चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारताने मागील वर्षाच्या तुलनेत ९३७.२२ दशलक्ष टन कोळसा उत्पादन करत २५ दिवसांच्या फरकाने मागे टाकले आहे. कोळसा उत्पादनात वाढ आणि पुरवठ्यातील कमतरता, यासाठी गेल्या काही वर्षांपासून सरकार काम करत आहे.

हेही वाचा : “इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून मॉस्कोत दहशतवादी हल्ला”, पुतिन यांचं वक्तव्य; युक्रेनचा उल्लेख करत म्हणाले…

तसेच आयात कमी करण्यासाठी देशांतर्गत उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. कोळसा उत्पादनाच्या देशांतर्गत उत्पादनामध्ये एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत वीज प्रकल्पांमधील आयात कोळशाचा वाटा जवळपास २१ टक्के कमी झाला असून हा टप्पा मागील काही वर्ष जवळपास २२.५ टक्के होता. चालू आर्थिक वर्षात कोळसा उत्पादन एक अब्ज टनाच्यावर जाईल आणि मार्च २०२५ पर्यंत देश स्वयंपूर्ण होईल, असा अंदात व्यक्त केला जात आहे. १ जानेवारीपर्यंत कोळसा कंपन्यांकडे असलेला कोळसा साठा ७०.३७ मेट्रिक टनापर्यंत पोहोचला होता. आता ही वाढ ४७.८५ टक्के वार्षिक वाढ मानली जाते.