काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणारे खासदार शशी थरुर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी एक ट्विट केलं आहे. या ट्विवट्च्या माध्यमातून त्यांनी आपल्या उमेदवारीला पाठिंबा वाढत असल्याचा दावा अप्रत्यक्षरीत्या केला आहे. यासाठी त्यांनी प्रसिद्ध गीतकार व शायर मजरूह सुलतानपुरी यांच्या एका प्रसिद्ध शेरची मदत घेतली. मात्र त्यांनी हा शेर ट्वीट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना इतिहासाची आठवण करुन दिली.

शशी थरुर यांनी काय ट्वीट केलं –

शशी थरुर यांनी मजरूह सुलतानपुरी यांचा प्रसिद्ध शेर ट्वीट केला. ‘मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया’ ही शायरी त्यांनी ट्वीट केली.

राजस्थानचे मुख्यमंत्रीपद, काँग्रेस अध्यक्षपदाबाबत अनिश्चितता; अशोक गेहलोत दिल्लीत, अध्यक्षपदी नव्या नावांची चर्चा

आपल्या इंग्रजी भाषेवरील प्रभुवत्वासाठी ओळखले जाणारे शशी थरुर यांनी उर्दू भाषेतील शायरी ट्विट केल्यानंतर अनेकांनी त्यांचं कौतुक केलं. काहींनी त्यांना काँग्रेस अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी पाठिंबा दिला. मात्र यावेळी काही नेटकऱ्यांनी थरुर यांना जवाहरलाल नेहरुंचं सरकार असताना मजरूह सुलतानपुरी यांना सरकारविरोधी कविता लिहिल्याने कारागृहात टाकलं होतं याची आठवण करुन दिली.

मजरूह सुलतानपुरी यांना १९४९ मध्ये प्रस्थापित सरकारविरोधी लिखाण केल्याने कारागृहात टाकण्यात आलं होत. नेहरु सरकारविरोधात लिहिल्याने त्यांना दोन वर्षांचा कारावास भोगावा लागला होता. ते लिखाण काय होतं जाणून घ्या…

मन में जहर डॉलर के बसा के
फिरती है भारत की अहिंसा
खादी के केंचुल को पहनकर
ये केंचुल लहराने न पाए
अमन का झंडा इस धरती पर
किसने कहा लहराने न पाए
ये भी कोई हिटलर का है चेला
मार लो साथ जाने न पाए
कॉमनवेल्थ का दास है नेहरू
मार ले साथी जाने न पाए

मजरूह सुलतानपुरी यांना माफी मागण्यास सांगण्यात आलं होतं, पण त्यांनी नकार दिला होता. यानंतर त्यांच्यासह बलराज सहानी यांच्यासारख्या अनेक सेलिब्रिटींना कारागृहात जावं लागलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शशी थरूर ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार २२ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसृत करण्यात आली असून, २४ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ती ३० सप्टेंबपर्यंत सुरू राहणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ८ ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास १७ ऑक्टोबरला मतदान होईल आणि १९ ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाईल.