देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कमी होत आहे. मात्र अनेक राज्यात करोना रुग्ण आढळत असल्याने केंद्राने राज्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच लोक करोना नियम पाळत नसल्यास कडक निर्बंध लावण्याच्या सुचना दिल्या आहेत. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार करोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार दिसत आहे. काल देशात दिवसभरात ३८ हजार ७९२ नव्या बाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासात ४१ हजार ८०६ नवीन करोना रुग्ण आढळले आहेत.
देशात दिवसभरात ४१ हजार ८०६ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३९ हजार १३० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तसेच ५८१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
India reports 41,806 new #COVID19 cases, 39,130 recoveries, & 581 deaths in the last 24 hours, as per Health Ministry
Total cases: 3,09,87,880
Total recoveries: 3,01,43,850
Active cases: 4,32,041
Death toll: 4,11,989Total vaccinated: 39,13,40,491 (34,97,058 in last 24 hrs) pic.twitter.com/gyZqhcksfn
— ANI (@ANI) July 15, 2021
आतापर्यंत देशात ३,०९,८७,८८० करोना रुग्ण आढळले आहेत. तर ३,०१,४३,८५० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. ४,११,९८९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात ४,३२,०४१ बाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
…तर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करा
करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र नागरीकांनी मोठ्या प्रमाणाक गर्दी करायला सुरवात केली आहे. तज्ज्ञांनी करोना साथीच्या तिसर्या लाटेचा इशारा दिल्यानंतरही लोक खबरदारी घेत नाहीत. राज्यांनी घातलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर लोक पर्यटनस्थळे आणि बाजारपेठेत मोठी गर्दी करत आहेत. या पार्श्वभूमीवर करोना नियमांचे पालन होत नसेल तर तर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिल्या आहेत.