देशात करोनाचे १८,४५४ नवे रुग्ण, १६० जणांचा मृत्यू

देशभरात आतापर्यंत एकूण ३ कोटी ४१ लाख २७ हजार ४५० जणांना करोनाची लागण झाली आहे.

Corona Virus

देशातील उपचाराधीन रुग्णांत मोठी घट झाली आहे. १ लाख ७८ हजार ८३१ रुग्णसंख्या बुधवारी नोंदली गेली. उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या ०.५२ टक्के इतकी आहे. मार्च २०२० नंतर ही सर्वात कमी उपचाराधीन रुग्णसंख्या आहे. तर करोनामुक्त होण्याची टक्केवारी देखील ९८.१५ इतकी झाली असल्याचे  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले आहे.

गेल्या २४ तासांत १८,४५४ रुग्णांची नोंद झाली तर १६० जणांचा मृत्यू झाला आहे. सलग २७ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ही ३० हजारांखाली तर सलग ११६ दिवसांपासून ५० हजारांखाली नोंदल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.

देशभरात आतापर्यंत एकूण ३ कोटी ४१ लाख २७ हजार ४५० जणांना करोनाची लागण झाली आहे. तर करोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ५२ हजार ८११ झाली आहे. तर मृत्यू दर १.३३ टक्के नोंदला गेला आहे.

आतापर्यंत ३ कोटी ३४ लाख ९५ हजार ८०८ जण करोनामुक्त झाले आहेत. बुधवारी १२ लाख ४७ हजार ५०६ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण ५९ कोटी ५७ लाख ४२ हजार २१८ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

दैनंदिन रुग्णवाढीचा दर १.४८ टक्के इतका नोंदला असून गेल्या ५२ दिवसांपासून  रुग्णवाढीचा दर ३ टक्क्यांहून कमी नोंदला गेला आहे. साप्ताहिक रुग्णवाढीचा दर १.३४  टक्के नोंदला आहे. सलग ११८ दिवसांपासून साप्ताहिक रुग्णवाढीचा दर ३ टक्क्यांहून कमी नोंदला गेला आहे. भारतात लसीकरण झालेल्यांची संख्या १०० कोटींहून अधिक झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona virus infection corona patient 160 killed akp

Next Story
…म्हणून हे छायाचित्र इंटनरनेटवर ठरतयं प्रचंड लोकप्रियThis One Photo Sums Up the Difference Between the Generations , viral photo, The internet loves this photo , Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
ताज्या बातम्या