नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत करोना रुग्णसंख्येत वाढ झाली असून ४१,९६५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४६० जणांचा मृत्यू झाला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जाहीर केले आहे.

उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून ती ३ लाख ७८ हजार१८१  झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या १.१५ टक्के इतकी नोंदली गेली आहे.

देशभरात आतापर्यंत एकूण ३ कोटी २८ लाख १० हजार ८४५ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर करोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ३९ हजार २० झाली आहे. तर मृत्यू दर १.३४ टक्के नोंदला गेला आहे. करोनामुक्त होण्याची टक्केवारी ९७.५१ इतकी झाली असल्याचे  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. आतापर्यंत ३ कोटी १९ लाख ९३ हजार ६४४ जण करोनामुक्त झाले आहेत.

दैनंदिन रुग्णवाढीचा दर २.६१ टक्के नोंदला गेला आहे. तर साप्ताहिक रुग्णवाढीचा दर २.५८ टक्के इतका नोंदला आहे. गेल्या ६८ दिवसांपासून रुग्णवाढीचा दर ३ टक्क्यांपेक्षा कमी नोंदला गेला आहे. दैनंदिन रुग्णसंख्या सलग ६६ दिवसांपासून ५० हजारांच्या खाली नोंदली गेली आहे. मंगळवारी १६ लाख ६ हजार ७८५ चाचण्या करण्यात आल्या. तर देशभरात लसीकरण झालेल्यांची एकूण संख्या ६५.४१ कोटी झाली आहे.

केरळमध्ये ३२,८०३ रुग्ण

केरळमध्ये रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून गेल्या २४ तासांत ३२,८०३ जणांना करोनाची लागण झाली असून १७३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या ४० लाख ९० हजार ३६ झाली असून एकूण २०,९६१ जणांचा मृत्यू झाला आहे.