भारतीय कंपनीने बनवला कार्डबोर्डचा बेड, किंमत फक्त ९०० रुपये; करोनाविरुद्धच्या लढाईत ठरणार उपयुक्त

करोनाच्या पार्श्वभूमीवर हे बेड ठरणार फायद्याचे

(फोटो सौजन्य: Aryan Paper Group)

करोनाचा प्रादुर्भाव जगभरातील १८० हून अधिक देशामध्ये झाला आहे. जगभरातील अनेक देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव इतक्या मोठ्या प्रमाणात झाला आहे जिवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आहे. आरोग्य सेवेवर ताण पडताना दिसत असून अनेक ठिकाणी पीपीई किट्स (पर्सल प्रोटेकटीव्ह इक्वीपमेंट), मास्क, व्हेंटीलेटर्स आणि बेड्सचा तुटवडा जाणावर आहेत. अमेरिकेबरोबरच इटली, स्पेनसारख्या युरोपीयन देशामध्ये तर करोनामुळे हाहाकार उडला आहे. त्या तुलनेत भारतामध्ये अद्याप परिस्थिती बरीच चांगली आहे. मात्र परदेशातील परिस्थितीचा अंदाज घेत भारतामधील एका कंपनीने स्वस्त बेडची निर्मिती केली आहे. गुजरातमधील वापी येथील आर्यन पेपर (Aryan Paper) कंपनीने फोल्ड होणारा आणि पूर्णपणे कार्डबोर्डपासून बनवलेल्या बेडची निर्मिती केली आहे.

कार्डबोर्डपासून बनवल्यामुळे हा बेड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे आणि तो तयार करणे अगदीच सोप्पे आहे. भविष्यामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये बेडचा तुटवडा निर्माण झाल्यास या बेडचा वापर करणे शक्य होणार आहे.

वाचून आश्चर्य वाटेल मात्र या बेडचे वजन १० किलोपेक्षा कमी आहे. असं असलं तरी या बेडवर २०० किलोपर्यंतचे वजन ठेवता येऊ शकते असं कंपनीने म्हटलं आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये हा बेड वापरण्यात येण्याची शक्यता असल्याने या बेडवर विशेष प्रकारच्या रसायनांचे कोटींग करण्यात आलं असून त्यामुळे हा बेड सहज ओला होणार नाही. म्हणजेच एखादा द्रव पदार्थ सांडल्यास किंवा बेडच्या संपर्कात आल्यास, बेडच्या रचनेवर काही विशेष फरक पडणार नाही.

Photo: Aryan Paper Group

हा बेड तयार करण्यासाठी कोणतीही हत्यारे लागत नाही हेही या बेडचे वैशिष्ट्य आहे. शाळेमध्ये एखाद्या प्रोजेक्टदरम्यान जसं खाच्यांमध्ये अडकवून एखादे मॉडेल तयार केले जाते त्याचप्रमाणे हा बेड उभारता येतो. अवघ्या काही मिनिटांमध्ये कोणत्याही समजदार व्यक्तीला हा बेड तयार करता येईल इतके सोपे तंत्रज्ञान यामध्ये वापरण्यात आलं आहे. हा बेड पर्यावरणपुरक आहे. म्हणजेच वापर झाल्यानंतर किंवा अती वापरामुळे खराब झाल्यास हा कार्डबोर्डने बनवला असल्याने त्याचे विघटन होते आणि त्यामुळे घन कचऱ्याची निर्मिती होत नाही.

Photo: Aryan Paper Group

या बेडची किंमत ९०० ते हजार रुपयांदरम्यान असून बेडच्या डिलेव्हरीचे वेगळे शुल्क कंपनीकडून आकारले जाईल असं सांगण्यात येत आहे. सध्या हे बेड गुजरात सरकार, मुंबई महानगरपालिका आणि भारतीय नौदलाला पुरवले जात आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Coronavirus made in india cardboard bed costs rs 900 and gets ready in minutes for covid 19 cases scsg

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या