पीटीआय, नवी दिल्ली

न्यूजक्लिक वृत्त संकेतस्थळाचे संस्थापक प्रबीर पूरकायस्थ आणि मनुष्यबळ विभागाचे प्रमुख अमित चक्रवर्ती यांना त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरची प्रत द्या, असे निर्देश दिल्ली न्यायालयाने गुरुवारी दिल्ली पोलिसांना दिले. पूरकायस्थ आणि चक्रवर्ती यांना पोलिसांनी बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याखाली (यूएपीए) अटक केली असून त्यांच्याविरोधात दहशतवादाशी संबंधित कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

bombay high court, nagpur bench Judges, cast vote, queue
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मतदानासाठी रांगेत…
Byju India CEO Quits
बैजूजचे मुख्याधिकारी अर्जुन मोहन यांचा राजीनामा; संस्थापक रवींद्रन यांच्या हाती आता दैनंदिन कारभार
ED claim in court in Delhi liquor scam case that crime is impossible without Sisodian  participation
सिसोदियांच्या सहभागाशिवाय गुन्हा अशक्य! दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ‘ईडी’चा न्यायालयात दावा
Sunita Kejriwal
‘आप’च्या ५५ आमदारांनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट; मुख्यमंत्रीपदाबाबत दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…

या दोघांनाही दिल्ली पोलिसांनी मंगळवारी दिवसभर केलेल्या चौकशीनंतर अटक केली. मात्र, आपल्याला एफआयआरची प्रत मिळालेली नाही, अशी तक्रार करून दोन्ही आरोपींनी त्यासाठी गुरुवारी अर्ज केला. तो अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश हरदीप कौर यांनी मान्य केला. पूरकायस्थ यांचे वकील दूरदृश्य पद्धतीने सुनावणीमध्ये सहभागी झाले. आपल्या अशिलाला एफआयआरची प्रत मिळणे हा त्यांचा अधिकार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. तर चक्रवर्ती यांच्या वकिलांनी त्यांच्या अटकेची कारणे लिखित स्वरूपात मागितली. त्यांच्या घटनात्मक सुरक्षेसाठी ते आवश्यक असल्याचे कारण त्यांनी दिले. पूरकायस्थ आणि चक्रवर्ती यांनी चीनधार्जिणा दुष्प्रचार करण्यासाठी बेकायदा पद्धतीने चीनकडून निधी घेतल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी ठेवला आहे.पूरकायस्थ आणि चक्रवर्ती यांना एफआयआरची प्रत देण्यास विशेष सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी विरोध केला.

हेही वाचा >>>“पुरुष हा पुरुष असतो आणि स्त्री…”, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं ‘ते’ विधान चर्चेत!

अभिसार शर्मा, उर्मिलेश यांची पुन्हा चौकशी

‘न्यूजक्लिक’ प्रकरणात दिल्ली पोलिसांनी गुरुवारी पत्रकार उर्मिलेश आणि अभिसार शर्मा यांची दुसऱ्यांदा चौकशी केली. केंद्र सरकारविरोधात खोटय़ा माहितीचा प्रसार करण्यासाठी न्यूजक्लिकला चीनमधून होणाऱ्या कथित निधीपुरवठा प्रकरणाबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या दोघांचीही मंगळवारी दिवसभर चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना दिल्ली दंगल व शेतकरी आंदोलनाचे वार्ताकन, सीएए आणि एनआरसीविरोधातील निदर्शने, परदेशात होणारे फोन कॉल याबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते.