फायझर-बायोएनटेकच्या लसीकरणानंतर शुक्राणूंवर कोणताही परिणाम होत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. इस्राईली अभ्यासकांनी सखोल संशोधन केल्यानंतर ही माहिती दिली आहे. लसीकरणानंतर शुक्राणूंच्या संख्येत आणि क्षमतेत कोणताही बदल झाला नसल्याचं निष्पन्न झालं आहे. या अभ्यासासाठी संशोधकांनी ४३ जणांचे शुक्राणू नमुने घेतले होते. या ४३ जणांनी एका महिन्याभरापूर्वी लसीकरण केले होते. त्यामुळे फायझर-बायोएनटेक लस आणि शुक्राणूंचा काही एक संबंध नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इस्राईली अभ्यासकांनी शुक्राणूंमधील घटक, संख्या आणि गतिशीलता यात कोणताही बदल झाला नसल्याचं सांगितलं आहे. या बाबतचा संपूर्ण अहवाल मेडआरक्झिववर प्रकाशित करण्यात आला आहे.

लशींवरील बौद्धिक संपदा हक्क माफ होण्याचा मार्ग मोकळा; भारताच्या प्रस्तावाला अमेरिकेचा पाठिंबा

‘या अहवालानंतर जगभरातील तरुणांमधील गैरसमज दूर होणार आहे. त्यामुळे पुरुषांना लसीकरण करताना कोणतीही अडचण येणार नाही. तसेच गर्भधारणेसाठी इच्छुक असलेली जोडपीही लसीकरण करु शकतात. कारण या लसीचा शुक्राणूंवर काही एक परिणाम होत नाही’, असं इस्राईली अभ्यासकांनी सांगितलं आहे. इस्राईली अभ्यासकांनी केलेल्या अभ्यासानंतर शंका दूर झाली आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला वेग मिळणार आहे. मागच्या अभ्यासात करोनामुळे शुक्राणूंवर परिणाम होत असल्याचं सांगण्यात आलं होतं.

करोना रुग्णांचा नकोसा विक्रम! एका दिवसात ४ लाख १२ हजार ६१८ रुग्ण

करोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये न्यूरोसायकियाट्रिक लक्षणं दिसून आली आहेत. १९ हजार रुग्णांचा ५१ संस्थानी केलेला अभ्यास आणि सहा महिने देखरेखीखाली ठेवल्यानंतर ही बाब समोर आली आहे. करोनानंतर ७७ दिवस रुग्णांची देखरेख करण्यात आली. त्यात २७.४ टक्के लोकांना झोपेची समस्या, २४.४ टक्के लोकांना थकवा, १९.१ टक्के लोकांमध्ये चिंता करण्याच्या प्रमाणात वाढ, तर १५.७ टक्के लोकांमध्ये मानसिक ताण असल्याचं दिसून आलं आहे. तसेच चक्कर येणे ही बाब सामान्य असल्याचं सांगण्यात आलं आहे. या बाबतचा संपूर्ण अहवाल मेडआरक्झिववर प्रकाशित करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid vaccine pfizer biontech dose not effect on sperm israeli reaserch rmt
First published on: 06-05-2021 at 11:34 IST