Ahmedabad Shooter Abhishek : गुजरातमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबादमध्ये एका गुन्हेगाराने एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील एका कड्यावर चढून उडी मारण्याची धमकी देत पोलिसांपासून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या गुन्हेगाराने पोलिसांपासून वाचण्यासाठी हा प्रकार केल्याचं सांगितलं जात असून या संपूर्ण घटनेदरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
संबंधित आरोपीने पोलिसांना आत्महत्या करण्याची धमकी देत इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील एका कड्यावरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आरोपीस मोठ्या शिताफीने अटक केलं आहे. अभिषेक उर्फ ’शूटर’ म्हणून त्या आरोपीला ओळखलं जात होतं. या संपूर्ण घटनेदरम्यान या आरोपीने सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रीमिंग केलं आणि लाईव्हच्या माध्यमातून पोलिसांना मागे हटण्याची मागणी केली. तसेच यावेळी आरोपी अभिषेकने पोलिसांसमोर शरण जाण्यापेक्षा मृत्यू चांगला असं म्हटलं. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
झालं असं की, अहमदाबाद गुन्हे शाखेला आरोपी अभिषेक हा त्याच्या निवासस्थानी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस आले आणि एका इमारतीमधील आरोपीच्या घराचा दरवाजा ठोठावला, पण दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर आरोपीला पोलीस आल्याची कुणकुण लागली. तेव्हा त्याने घराचा दरवाजा उघडण्यास नकार दिला. त्याचवेळी आरोपीने त्याच्या घरातील स्वयंपाक खोलीच्या खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि खाली खिडकीजवळच्या एका अरुंद कड्यावर उभा राहिला.
यावेळी पोलीस आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे आरोपीने या संपूर्ण घटनेचं सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रीमिंग केलं होतं. तसेच हा सर्व प्रकार पाहून त्या इमारतीमधील आणि आसपासच्या लोकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. हा प्रकार जवळपास एका तासांपेक्षा जास्त वेळ सुरु होता. या हाय व्होल्टेज ड्राम्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. बराच वेळ झाल्यानंतर अखेर आरोपीला अग्निशमन दलाच्या जवानांनी कड्यावरून खाली उतरवलं.
When the team of City Crime Branch in Ahmedabad, Gujarat reached to arrest a criminal, he started threatening to jump in the style of the movie Sholay. The Crime Branch had to work hard to arrest Abhishek alias Shooter AK 47. pic.twitter.com/NV4wsH61tM
— Mohd Nadeem Siddiqui?? (@nadeemwrites) June 7, 2025
दरम्यान, आरोपीच्या अटकेनंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अजित राजियान यांनी सांगितलं की, “अभिषेक हा अहमदाबादच्या पूर्वेकडील जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला एक गुन्हेगार आहे. तो बऱ्याच काळापासून अटकेपासून वाचत होता. शहराच्या गुन्हे शाखेच्या अनेक पथकांनी त्याचा सक्रियपणे शोध घेतला. आज माहितीनुसार तो त्याच्या घरी उपस्थित असल्याची पुष्टी झाली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.”
#WATCH | Gujarat: Ajit Rajian, DCP, Crime Branch Ahmedabad says, "Today, the Crime Branch arrested an accused, Abhishek Tomar alias Shooter. He has more than six ongoing cases against him, he was wanted in four of these. When Police attempted to nab him, he rushed out of his… pic.twitter.com/1SfFZHqRmd
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— ANI (@ANI) June 7, 2025
दरम्यान, गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने रेकॉर्ड केलेल्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी आरोपी अभिषेकला शरण जाण्यास सांगत होते. तेव्हा तो पोलिसांना असं म्हणत होता की, “मला माहित आहे की तुम्ही माझ्याशी कसे वागाल?खरोखरच वाईट होणार आहे. तुमच्यासमोर शरण जाण्यापेक्षा मरणं चांगलं.”