भारतीय सैन्यात एकात्मिता आणण्यासाठी भारतीय लष्करात आता क्रॉस पोस्टिंग योजना राबवण्यात येणार आहे. यामुळे तिन्ही सैन्यदलांमध्ये मनुष्यबळाची अदलाबदल होणार आहे. ४० लष्करी अधिकाऱ्यांची एक मोठी तुकडी लवकरच भारतीय हवाईदल आणि नौदलात तैनात केली जाणार आहे. येथेही ते लष्कराप्रमाणेच काम करणार आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

मेजर आणि लेफ्टनंट कर्नलच्या पदांवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची क्रॉस-स्टाफिंग पोस्टिंग होणार आहे. हवाईदल आणि नौदलातील अधिकाऱ्यांचेही लष्करी विभागात नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.

युवीए, शस्त्र प्रणाली, रडार, वाहने, दूरसंचार उपकरणे या तिन्ही सेवांमध्ये समान आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांना मिसाईल युनिट्समध्ये युएव्ही, लॉजिस्टिक, दुरुस्ती आणि रिकव्हरी, साहित्य आणि पुरवठा व्यवस्थापनासाठी अधिकाऱ्यांची अदलाबदल करण्यात येणार आहे.

आतापर्यंत अशी काही मोजक्याच पोस्टिंग झाल्या आहेत, जिथे काही लष्करी अधिकारी नौदल ऑपरेशन्समध्ये किंवा आयएएफमध्ये फ्लाईंग रोलमध्ये निवडलेल्या भूमिकांमध्ये नियुक्त करण्यात आले होते. संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, “क्रॉस फंक्शनल टीम तयार करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे लष्करात एकात्मता जोपासली जाऊ शकतो. तसंच, अधिकारी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीलाच प्रत्येक सेवेतील नियम, कार्यपद्धती आणि बारकावे शिकू शकतील.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“क्रॉस स्टाफिंग पोस्टिंगमुळे तिन्ही सेवेतील कार्य अधिकाऱ्यांना समजून घेता येणार आहे. तसंच, यामुळे तिन्ही दलांमध्ये समन्वय राखला जाईल. यामुळे अहवाल प्रक्रिया, खरेदी, पुरवठा साखळी व्यवस्थापनाच्या दृष्टीने विविध आव्हानांवर मात करण्यास मदत होईल”, असंही एका अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.