दिल्लीच्या केजरीवाल सरकारने आपली मोफत रेशन योजना आणखी सहा महिने वाढवत असल्याची घोषणा केली आहे. याचबरोबर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून म्हटलं आहे की, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्ग मिळणाऱ्या रेशनचा कालावधी देखील आणखी सहा महिने वाढवला जावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्र सरकारची मोफत रेशन योजना ३० नोव्हेंबर पर्यंत बंद होऊ शकते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की, महागाई बरीच वाढली आहे आण करोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउननंतर अनेक लोक बेरोजगार झाले आहे आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना आवाहन आहे की गरिबांसाठी मोफत रेशन देण्याच्या या योजनेला सहा महिने वाढवलं जावं.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची घोषणा मार्च २०२० मध्ये कोविड-19 मुळे निर्माण झालेले संकट दूर करण्यासाठी करण्यात आली होती. सुरूवातीस ही योजना तीन महिन्यांसाठी होती मात्र नंतर कालावधी वाढवल्या गेला. सध्या देशात ८० कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi cm arvind kejriwal writes to pm narendra modi msr
First published on: 06-11-2021 at 17:24 IST