Delhi Crime News : देशभरातील काही प्रमुख शहरांमध्ये गुन्ह्यांचे प्रस्थ वाढत चालल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आता दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. पश्चिम दिल्लीमधील विकासपुरी परिसरात राहणाऱ्या एका सिरीयन शरणार्थी व त्याच्या तान्ह्या बाळावर अॅसिड हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. हा हल्ला त्याच परिसरात राहणाऱ्या एका गटाने केला असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत धक्कादायक म्हणजे ११ महिन्यांच्या बाळावर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे दिल्लीत खळबळ उडाली आहे. सध्या या दोघांवर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेत सोमवारी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करण्यात येत आहे. ही घटना ३० सप्टेंबर रोजी घडल्याची माहिती सांगण्यात येत आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव रफत असं असून तो त्याच्या पासपोर्टनुसार सीरियन आहे. तो त्याच्या पत्नी आणि ११ महिन्याच्या बाळासह संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्त कार्यालयाच्या आसपास रस्त्यावर राहतात होता. मात्र, त्यांना त्या ठिकाणी राहण्यास स्थानिक लोकांनी विरोध केला होता.

हेही वाचा : ‘एआय’चा पाया रचणाऱ्यांना भौतिकशास्त्राचे नोबेल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेबाबत रफत यांनी सांगितलं की, “अॅसिड हल्ला झाल्यानंतर त्याचे मान आणि खांदे काही प्रमाणात भाजले. मागील काही आठवड्यांपूर्वी त्याने कॉल सेंटरची नोकरी देखील गमावली. त्यानंतर त्याने मदतीसाठी UNHCR कडे संपर्क साधला. पण आम्ही शरणार्थी आहोत आणि आम्ही मदतीसाठी फक्त यूएनएचसीआरकडे मदत मागू शकतो. मात्र, आम्हाला तेथील अधिकाऱ्याने मदत नाकारली आणि आमच्याकडे रस्त्यावर थांबण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे तात्पुरते आम्ही रस्त्यावर राहिलो. मात्र, स्थानिक लोकांना आमच्या राहण्याची समस्या होती आणि ते आमच्याशी गैरवर्तन होते. ३० सप्टेंबर रोजी मारिसाजवळ सार्वजनिक शौचालय वापरत असताना एका गटाने हल्ला केला. तेव्हा मी पळण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी माझ्यावर आणि माझ्या मुलावर काहीतरी फेकले. त्यामुळे माझी त्वचा जळू लागली. दरम्यान, रफत यांनी दावा केला की, त्यांनी अनेक ऑटोरिक्षा चालकांना स्वत:ला आणि त्यांच्या मुलाला रुग्णालयात नेण्यासाठी आवाहन केले. मात्र, कोणतीही मदत केली नाही. त्यानंतर एका दुचाकीस्वाराने मदत केली आणि रुग्णालयात सोडले.” दरम्यान, या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.