दिल्लीत उभारली जातेय अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती ; दिवाळीत मुख्यमंत्री केजरीवालांसह मंत्रिमंडळ करणार पूजा!

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांसह येथे ४ नोव्हेंबर रोजी दिवाळी पूजन करणार आहेत.

दिल्ली सरकार आपल्या ‘दिल्ली की दिवाळी’ उत्सवाचा भाग म्हणून त्यागराज क्रीडा संकुलात अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती उभारत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांसह येथे ४ नोव्हेंबर रोजी दिवाळी पूजन करणार आहेत.

या अगोदर काल अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, जर गोव्यात आम आदमी पार्टीची सत्ता आली तर आमचे सरकार हिंदूंसाठी अयोध्येला आणि ख्रिश्चनांसाठी वेलनकन्नी येथे मोफत तीर्थयात्रेचे आयोजन करेल. तसेच, मस्लिमांसाठी आम्ही अजमेर शरीफ व साई भक्तांना शिर्डी येथे मोफत दर्शन यात्रा उपलब्ध करून देऊ. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीकडून गोव्यातील जनतेला देण्यात आलेलं आश्वासन आहे.

यावेळी पत्रकारपरिषदेत बोलताना केजरीवाल यांनी आरोप केला की, माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले असतानाही, भाजपा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.

जर गोव्यात ‘आप’ची सत्ता आली तर….; केजरिवालांची हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चनांसाठी घोषणा!

आगामी काळात होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरू आहे. भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर, आम आदमी पार्टीने देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी कंबर कसली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सर्व धर्मीयांसाठी घोषणा केली आहे. तसेच, उत्तराखंड आणि पंजाबनंतर आता गोव्यातही मोफत वीज देण्याची घोषणा देखील केजरीवाल यांनी या अगोदर केलेली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Delhi government building a replica of ayodhyas ram temple cm arvind kejriwal along with his cabinet ministers will perform diwali puja msr

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या