Delhi Mehek Murder : राजधानी दिल्लीत हत्येची एक भयंकर बातमी समोर आली आहे. प्रेयसीवर तिच्या प्रियकराने चाकूचे वार केले. त्यानंतर त्याने तिचा गळा दाबला आणि ती शेवटचा श्वास घेत नाही तोपर्यंत त्याने तिचा गळा आवळलाच होता. अत्यंत क्रूर पद्धतीने या मुलीच्या प्रियकराने तिची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर पेट्रोल ओतलं, मृत शरीरावर पेट्रोल ओतलं आणि पेटवून दिलं. तिची ओळख पटू नये म्हणून हे सगळं केल्याचंही या प्रियकराने सांगितलं.
नेमकी ही घटना काय घडली?
दिल्लीतल्या संजय वन भागातील जहांगीरपुरी या ठिकाणी राहणाऱ्या महक नावाच्या मुलीचा अत्यंत क्रूर पद्धतीने खून करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या प्रियकराने आधी तिच्या खांद्यावर चाकूचे वार केले. त्यानंतर तिचा गळा दाबला आणि तिची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. यानंतर अर्शकृतने तिच्या मृतदेहावर पेट्रोल ओतलं आणि तो मृतदेह पेटवून दिला. त्याला वाटलं की आता आपण या प्रकरणात अडकणार नाही. अर्शकृत त्यानंतर सराईतपणे त्याच्या घरी पोहचला आणि घराजवळ असलेल्या एका रुग्णालयात दाखल झाला. त्याने त्याच्या घरातल्या लोकांना सांगितलं की महकने तिच्या दोन मित्रांकडून माझ्यावर चाकू हल्ला केला. महकवर जो जीवघेणा हल्ला अर्शकृतने केला त्यावेळी त्यालाही काही जखमा झाल्या होत्या. यामुळे त्याने घरी आल्यावर हा बनाव रचला. मात्र पोलिसांनी अर्शकृतला अटक केली.
महकच्या कुटुंबाने काय सांगितलं?
महकच्या कुटुंबाने असं सांगितलं आहे की ती जैन कॉरस्पाँडन्समधून इंग्रजीचा अभ्यास करत होती. तसंच कोरियन भाषाही शिकत होती. रविवारी सकाळी ८ च्या दरम्यान महक तिच्या घरुन इन्स्टिट्युमध्ये जाण्यासाठी निघाली होती. पण ती संजय वन भागात पोहचली तिथे अर्शकृत तिची वाट बघत उभा होती. रविवारी सकाळी ११.३० च्या दरम्यान महकच्या आईने तिला फोन केला होता. त्यावेळी महकने सांगितलं की दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान मी घरी परत येईन. दुपारी २.३० वाजता महकच्या आईने फोन केला. तर तिचा फोन स्विच ऑफ येत होता. असं का घडलं? या विचारात महकचे आई वडील होते. तितक्यात अर्शकृतच्या वडिलांनी महकच्या वडिलांना फोन केला आणि सांगितलं की अर्शकृतला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे कारण महकने त्याच्यावर तिच्या दोन मित्रांकरवी चाकू हल्ला केला. महकच्या वडिलांनी विचारलं की हे कुठे घडलं? त्यावर अर्शकृतच्या वडिलांनी संजय वन भागात ही घटना घडल्याचं सांगितलं. महक घरी आली नाही त्यामुळे घरातल्यांची चिंता वाढली. त्यातून असा फोन आल्याने त्यांना आणखी काळजी वाटू लागली.
महारौली पोलीस ठाण्यात तक्रार
त्यानंतर तातडीने महकचे कुटुंबीय जहांगीरपुरी या ठिकाणी पोहचले. त्यावेळी तु्म्ही त्या भागातल्या पोलीस ठाण्यात जा असं त्यांना सांगण्यात आलं. महकच्या कुटुंबाने महारौलीच्या परिसरातही महकचा शोध सुरु केला. पण ती सापडली नाही किंवा तिच्याशी काही संपर्कही झाला नाही. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास महकचे कुटुंबीय महारौली पोलीस ठाण्यात पोहचले. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आणि महकचा शोध सुरु केला. या दरम्यान सोमवारी सकाळी महकचा मृतदेह पोलिसांनना संजय वन भागात बेवारस अवस्थेत आढळून आला. रक्ताने माखलेला आणि अर्धवट जळालेला महकचा मृतदेह पोलिसांना मिळाला. त्यानंतर अर्शकृतला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने महकची हत्या केल्याची कबुली दिली. काय काय घडलं? महकला कसं मारलं तेदेखील त्याने पोलिसांना सांगितलं. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आता पुढील तपास सुरु आहे. आज तकने हे वृत्त दिलं आहे.
महकच्या हत्येआधी काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महकला अर्शकृतने भेटायला बोलवलं होतं. संजय वन भागात ती त्याला भेटायला गेली. त्यावेळी संजय वन भागात फारशी वर्दळ नव्हती. तिथे सुरुवातीला हे दोघं बोलू लागले आणि नंतर त्यांचं भांडण झालं. या भांडणानंतर अर्शकृतने महकवर चाकूने वार केले, तिचा गळा दाबून तिला ठार केलं आणि मग मृतदेहावर पेट्रोल ओतून तो पेटवला. महकला मारण्यासाठी अर्शकृत चाकू आणि पेट्रोलच्या दोन बाटल्या बरोबर घेऊन गेला होता अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात त्याला अक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरु आहे.