श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण ताजं असतानाचा दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. २४ वर्षीय तरुणाने आपल्या प्रेयसीचा पहिल्यांदा गळा आवळून खून केला आहे. या खूनानंतर तिचा मृतदेह एका ढाब्यातील फ्रीजमध्ये ठेवला. ही खळबळजनक घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. याच प्रकरणात आता नव नवीन माहिती समोर येत आहे.

साहिल गेहलोत असं आरोपी तरुण आणि निक्की यादव असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे. साहिलच्या कुटुंबियांनी त्याचं दुसऱ्या तरुणीसह लग्न ठरवलं होतं. ही माहिती मिळाल्यावर निक्कीने यास विरोध दर्शवला. त्यावरूनच साहिलने निक्कीचा खून केल्याची माहिती तपासात पुढं आली आहे.

अशातच निक्की यादवचा ९ फेब्रुवारीचे दोन सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आले आहेत. पहिल्या व्हिडीओत निक्की आपल्या फ्लॅटमध्ये जाताना दिसत आहे. तर, दुसऱ्या व्हिडीओत निक्की अपार्टमेंटच्या बाहेर कोणाची तरी वाटत पाहत आहे. पण, नंतर ती आपल्या फ्लॅटमध्ये परत जाताना दिसत आहे.

हेही वाचा : “एकत्र जगू शकत नाही, मग…”, निक्कीने साहिलसमोर ठेवल्या होत्या ‘या’ तीन अटी; पण…

‘इंडियन एक्स्प्रेस’ला पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “ही शेवटची वेळ होती, जेव्हा निक्की या परिसरात दिसली. त्यानंतर हिमाचलला फिरण्यासाठी जाण्याच्या बहाण्याने साहिलने निक्कीला कश्मीरी गेट येथे नेलं. तेव्हा दोघांचं जोरदार वाद झाला. या वादानंतर साहिलने तिचा खून केला.”

हेही वाचा : श्रद्धा वालकर घटनेची पुनरावृत्ती! दिल्लीत गर्लफ्रेंडचा खून करुन मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला, अन्…

आधी निक्कीचा खून केला अन्…

लग्नावरून साहिल आणि निक्कीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. या भांडणानंतर साहिलने कश्मीरी गेट आयएसबीटी जवळ निक्की यादवचा खून केला. साहिलने मोबाईलच्या डेटा केबलने ९ आणि १० फेब्रुवारीच्या मध्यरात्री निक्कीचा गळा आवळला. निक्कीचा खून केल्यावर त्याने तिचा मृतदेह मित्राऊ गावात नेला. तिथे बंद एका ढाब्यातील फ्रीजमध्ये साहिलने निक्कीचा मृतदेह ठेवून दिला. यानंतर १० फेब्रुवारीला साहिलने कुटुंबियांनी जमवलेल्या तरुणीशी लग्न केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी पोलिसांनी साहिलला अटक केली आहे. त्याला दिल्लीतील न्यायालयात हजर केलं असता, पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.