पीटीआय, नवी दिल्ली

भारतीय तपास संस्थेच्या (एनआयए) ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीवरील दहशतवाद्यांपैकी एक असलेल्या मोहम्मद शाहनवाझ या ‘आयसिस’च्या हस्तकाला त्याच्या दोन साथीदारांसह दिल्ली पोलिसांनी सोमवारी अटक केली. हे तिघेही अभियंते आहेत.

शाहनवाझला दिल्लीतील जैतपूर येथे तर मोहम्मद रिझवान अश्रफ आणि मोहम्मद अर्शद वारसी यांना उत्तर प्रदेशातील अनुक्रमे लखनौ आणि मुरादाबाद येथे अटक करण्यात आली. त्यांच्याकडून स्फोटके बनवण्याचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे. या तिघांना न्यायालयाने एक आठवडय़ाची पोलीस कोठडी सुनावली आहे.  आरोपींनी पश्चिम आणि दक्षिण भारतात विविध भागांची पाहणी केली. त्यांना पश्चिम घाटात दहशतवादाचा अड्डा बनवायचा होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा>>>बिहार सरकारकडून जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर; ओबीसी समाज ६३ टक्के, खुला प्रवर्ग १६ टक्के

स्फोटके जप्त

शाहनवाझकडून पिस्तूल, काडतुसांसह प्लास्टिक आणि लोखंडी नळय़ा, विविध प्रकारची रसायने, स्फोटक बनवण्यासाठी वापरली जाणारी साधने इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहे.