scorecardresearch

Premium

बिहार सरकारकडून जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर; ओबीसी समाज ६३ टक्के, खुला प्रवर्ग १६ टक्के

बिहार सरकारने सोमवारी (२ ऑक्टोबर) जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली आहे.

bihar cast based census
बिहार सरकारकडून जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर (फोटो सौजन्य-एएनआय)

सध्या देशभर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीच्या काही महिने आधीच बिहार सरकारने सोमवारी (२ ऑक्टोबर) जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, बिहारची एकूण लोकसंख्या १३ कोटीहून अधिक असल्याचं निष्पन्न झालं आहे. राज्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ६३ टक्के लोक हे इतर मागासवर्गीय (ओबीसी) समुदायाचे असल्याचे जनगणनेतून समोर आलं आहे.

या जनगणनेत असं दिसून आलं आहे की, बिहारमधील १३ कोटी लोकसंख्येपैकी अनुसूचित जातींचा वाटा १९ टक्क्यांहून अधिक आहे. तर अनुसूचित जमाती १.६८ टक्के इतके आहेत. याशिवाय राज्याच्या लोकसंख्येच्या १५.५२ टक्के लोक उच्च जाती किंवा ‘सवर्ण’ समुदायाचे आहेत. सर्वेक्षणाच्या तपशीलवार विभाजनावरून, राज्यात मागासवर्गीय लोकसंख्या २७ टक्के आहे, तर अत्यंत मागास वर्ग (EBC) ३६ टक्के इतका आहे.

pm Suryaghar Free Power Scheme
मोफत वीज हवी! अशी आहे पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना…
candidates in Talathi recruitment
तलाठी भरतीतील दोन हजार उमेदवारांचे भवितव्य अधांतरी
This is BJP manifesto Congress reply to the government in the Lok Sabha on the white paper
हा भाजपचा जाहीरनामा! श्वेतपत्रिकेवरून लोकसभेत काँग्रेसचे सरकारला प्रत्युत्तर
Completed survey of Maratha society and open categories in Mumbai print news
मुंबईमधील मराठा समाज व खुल्या प्रवर्गांचे सर्वेक्षण पूर्ण; १४.९९ टक्के घरे बंद, ९.२३ टक्के कुटुंबिय नकारावर ठाम

एकूण लोकसंख्येच्या तुलनेत बिहारमध्ये भूमिहार समुदाय २.८६ टक्के आहे, तर ब्राह्मण समुदाय ३.६६ टक्के आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे कुर्मी समाजाचे आहेत, या समाजाची लोकसंख्या २.८७ टक्के इतकी आहे. तसेच उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे यादव समुदायाचे असून त्यांची लोकसंख्या १४ टक्के आहे. याशिवाय राज्यात मुसाहर समाज ३ टक्के आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Caste based census statistics released by bihar government obc community 63 percent open 16 percent rmm

First published on: 02-10-2023 at 16:06 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×