लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजीनामानाट्य शुक्रवारी दिल्लीतही सुरू राहिले. फडणवीस यांनी चोवीस तासांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दोनवेळा भेट घेतली मात्र, आत्ता तातडीने कोणताही निर्णय न घेण्याची सूचना शहांनी फडणवीसांना केल्याचे समजते. यासंदर्भात मोदींच्या शपथविधिनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार असला तरी फडणवीसांचा प्रस्ताव मान्य केला जाणार नसल्याचे सांगितले जाते.

ganesh naik waiting for about two and a half hours to meet minister uday samant
गणेश नाईक अडीच तास ताटकळत; मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर गंभीर आरोपांनंतर सामंतांशी चर्चेसाठी प्रतीक्षा
Ajit Pawar Piyush Goyal
“कांदा निर्यात बंदी करू नका, त्याने अनेकांना…”, अजित पवारांची पीयूष गोयल यांना विनंती
Ganesh Naik challenged the Chief Minister through CIDCO and Urban Development Department
अस्वस्थ गणेश नाईक यांचे थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान
Ganesh Naik, eknath shinde,
अस्वस्थ गणेश नाईकांचे थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान
Amol Mitkari
लाडकी बहीण योजनेत विरोधकांकडून गैरव्यवहार? अमोल मिटकरी म्हणाले, “सेतू केंद्रांवर एजंट सोडून…”
Atishis letter to Narendra Modi that the water issue in Delhi will escalate
दिल्लीतील पाणीप्रश्न चिघळणार! अतिशी यांचे नरेंद्र मोदी यांना पत्र; बेमुदत उपोषणाचा इशारा
Loksatta anvyarth Violent ethnic conflict in Manipur Home Ministership
अन्वयार्थ: एवढा विलंब का लागला?
Eknath Shinde order to office bearers to start preparations for Legislative Assembly election
विधानसभेच्या तयारीला लागा; मुख्यमंत्र्यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश; बुधवारी वर्धापन दिन

लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने या पराभवाची नैतिक जबाबदारी घेत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. सरकारमधून मुक्त केले तर राज्यभर फिरून संघटना मजबूत करण्याचे काम करेन असे फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे स्पष्ट केले आहे. ही भूमिका फडणवीस यांनी अमित शहा यांच्याकडेही मांडली आहे. शहांशी दोन वेळा चर्चा केल्यानंतरही फडणवीस राजीनाम्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे कळते. फडणवीसांचे म्हणणे शहांनी ऐकून घेतले असले तरी या संदर्भातील निर्णय ‘राखीव’ ठेवला आहे.

हेही वाचा >>>वाराणसीचे अस्वस्थ करणारे वास्तव…!

राज्यात भाजपच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली. त्यासाठी मोदी-शहांच्या भेटीसाठी फडणवीस गुरुवारी मुंबईहून थेट दिल्लीला रवाना होणार होते. मात्र, फडणवीस यांना नागपूरहून बोलावणे आल्यामुळे त्यांनी दिल्लीला न येता ते संघाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा नागपूरला गेले. संघाच्या नेत्यांकडेही फडणवीस यांनी आपले म्हणणे मांडले असल्याचे समजते. त्यानंतर फडणवीस गुरुवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. रात्री उशिरा त्यांनी शहांशी राजीनाम्याच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली.

संसदेमध्ये शुक्रवारी झालेल्या ‘एनडीए’च्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर दिल्लीत प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर फडणवीस यांनी शहांशी भेट घेऊन राजीनाम्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्याची विनंती केल्याचे समजते. मात्र, ‘एनडीए’च्या सरकार स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये शहा अत्यंत व्यग्र आहेत. त्यामुळे त्यांनी फडणवीसांना सरकारमधून बाहेर न पडण्याची सूचना केल्याचे समजते. मोदींच्या मंत्रिमंडळाचा रविवारी, ९ जून रोजी शपथविधी होणार असून त्यानंतरच फडणवीसांच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे समजते.

अस्थिरता वाढण्याची शक्यता

राज्य सरकारमधून देवेद्र फडणवीस बाहेर पडले तर सरकारमध्येही अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे फडणवीसांनी राजीनामा देणे योग्य नसल्याचे मत महायुतीतील घटक पक्षातील पदाधिकाऱ्याने व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीत भाजपने २८ जागा लढवल्या होत्या, त्यातील फक्त ९ जागांवर विजय मिळवता आला आहे.