गेल्या वर्षी २६ नोव्हेंबररोजी एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली विमानादरम्यान एका मद्यधुंद व्यक्तीने महिला सहप्रवाशावर लघुशंका केल्याची घटना घडली होती. त्यानंतर ६ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा एअर इंडियाच्या विमानात असाच प्रकार घडल्याचे उघडकीस आले होते. दरम्यान, याप्रकरणी आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअर इंडियाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. हा प्रकार अत्यंत घारणेरडा असून असे प्रकार विमानात घडत असतील, तर हे एअर इंडियाचे अपयश असल्याचे डीजीसीएने म्हटले आहे.

हेही वाचा – गोव्यातील नव्या मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळावर पहिले विमान; केंद्र आणि राज्य सरकारचे मोठे यश : प्रमोद सावंत

arrest One arrested in connection with attack on Indian High Commission
भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्लाप्रकरणी एकाला अटक
Mumbai, parks, misused, mnc,
मुंबई : १२ उद्यानांचा गैरवापर होत असताना पालिकेची डोळेझाक
Sanjay Singh
नितीश कुमारांचे बाहेर पडणे ‘इंडिया’ आघाडीसाठी मोठा धक्का? ‘आप’चे संजय सिंह म्हणाले…
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, डीजीसीएने याप्रकरणी एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. तसेच विमानचालक आणि विमानातील कर्मचाऱ्यांनाही याप्रकरणी दोन आवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर हे प्रकरण एअर इंडियाने अत्यंत अव्यावसायिकपणे हाताळले असून विमानात जर अशा घटना घडत असतील, तर ते एअर इंडियाचे अपयश असल्याचेही डीजीसीएने म्हटलं आहे.

हेही वाचा – Viral Video: “बिअर मिळणार का बिअर…?” इंडिगो विमानात ‘कॅबिन क्रू’कडे प्रवाशाची भन्नाट मागणी, गोव्याला जाताना नेमकं काय घडलं?

नेमकं काय आहे प्रकरण?

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर रोजी एअर इंडियाच्या फ्लाईट नंबर १४२ मध्ये एका पुरुष प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघुशंका केली होती. याप्रकरणी सीआरफीएफने पुरुष प्रवाशाला अटक केली होती. मात्र, महिलेची लेखी माफी मागितल्यानंतर प्रवाशाला सोडून देण्यात आले होते. तत्पूर्वी असाच प्रकार २६ नोव्हेंबर २०२२ रोजी देखील उघडकीस आला होता. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर कलम २९४ आणि ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.