चित्रपट आणि नाटय़क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारतातील कलाकार-दिग्दर्शक राहुल व्होरा (४८) यांचा फ्रान्स सरकारने गौरव केला आहे. व्होरा यांना ‘नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड लेटर्स’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कला, संस्कृती आणि साहित्यक्षेत्रात सर्जनशील कामगिरी करणाऱ्या मान्यवरास या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
नाटय़ चळवळीशी संबंधित असलेल्या ‘चिंगारी’ या गटाचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे व्होरा हे दिल्ली विद्यापीठाचे पदवीधारक आहेत. भारत आणि एकूणच जगातील विस्मृतीत गेलेल्या सर्व कलाकारांना हा पुरस्कार आपण समर्पित करीत आहोत, असे व्होरा यांनी सांगितले.