अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी सोशल मीडिया पोस्ट करत हे सांगितलं की मंगळवारी त्यांना अटक केली जाऊ शकते. जे माझे समर्थक आहेत त्यांनी याचा निषेध नोंदवावा असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांनी म्हटलं आहे की मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नीच्या कार्यालयाकडून त्यांना अटक करण्यात येईल. मला गुप्तचरांकडून ही माहिती मिळाली आहे. आरोप काय असतील ते सांगितलं गेलं नाही असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं आहे?

न्यूयॉर्कच्या काही सरकारी संस्था महिलांना दिलेल्या पैशांशी संबंधित प्रकरणाची चौकशी करत आहेत. या प्रकरणी त्यांना अटक होऊ शकते. माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी महिलांना शारीरिक संबंधांच्या बदल्यात पैसे देऊन हे प्रकरण सार्वजनिक करू नका, असे सांगितले होते, असा आरोप आहे. ट्रम्प यांनी शनिवारी पहाटे त्यांच्या सोशल नेटवर्क Truth Social वर एका पोस्टमध्ये सांगितले की, ”मॅनहॅटन अॅटर्नी कार्यालयातून बेकायदेशीरपणे लीक झालेल्या एका गुप्त माहितीनुसार त्यांना पुढील आठवड्यात मंगळवारी अटक केली जाईल.”

डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित प्रकरण काय?

हे प्रकरण पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियलशी संबंधित आहे. तिचं खरं नाव स्टेफनी क्लिफर्ड आहे. तिचं म्हणणं हे की डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत १० वर्षांपूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र ट्रम्प यांनी हे म्हणणं नाकारलं आहे. ट्रम्प यांनी स्टॉर्मीला तिचे आणि त्यांचे प्रेम संबंध आणि लैंगिक संबंध याबाबत काही वाच्यता न करण्यासाठी १.३० लाख डॉलर्स दिले होते असाही आरोप होतो आहे. याच प्रकरणाची चौकशी आता होते आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोनाल्ड ट्रम्प यांनी फेसबुक आणि युट्यूबवर कमबॅक

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरनंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेसबुक आणि यूट्यूबवरही कमबॅक केला आहे. लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर परतल्यानंतर ट्रम्प यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प लिहिले की, I’M BACK! यानंतर आता त्यांच्या अटकेची बातमी आली आहे.