Doanld Trump’s Grand Daughter Kai Trump Speech : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. पेनसिल्व्हेनियातील निवडणुकीच्या प्रचार रॅलीत त्यांच्यावर गोळीबार झाला. परंतु, ही गोळी त्यांच्या कानाला चाटून गेल्याने ते किरकोळ जखमी झाले. तर, या हल्ल्यात सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात हल्लेखोराचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, यावरून डोनाल्ड ट्रम्प यांच्या नातीने खेद व्यक्त केला आहे.

१७ वर्षीय काई ट्रम्प (Kai Trump) म्हणाली की, पेनसिल्व्हेनियातील निवडणूक रॅलीदरम्यान आजोबांना गोळ्या घालण्यात आल्याचे लक्षात आलं तेव्हा मला धक्का बसला. पण ते सुखरूप आहेत हे मला जाणून घ्यायचं होतं. बऱ्याच लोकांनी माझ्या आजोबांना त्रास दिला आहे, परंतु तरीही ते उभे आहेत.”

ती म्हणाली की, “माझे आजोबाही इतर आजोबांप्रमाणे असून ते आम्हाला कँडी आणि सोडा द्यायचे. माझ्या आजोबांना देशाची वेगळी छटा निर्माण करायची आहे. माध्यमांमुळे माझे आजोबांची वेगळी प्रतिमा तयार झाली आहे. पण ते कसे आहेत हे आम्हाला माहितेय. ते खूप काळजी घेणारे आणि प्रेमळ आहेत. त्यांना खरंच या देशाला सर्वोत्तम बनवायचं आहे. ते अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी प्रत्येक दिवस लढत राहतील”, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. “आम्ही शाळेत कसे आहोत हे त्यांना नेहमी जाणून घ्यायचे असते”, असंही ती (Kai Trump) आपल्या आजोबांविषयी म्हणाली.

“आजोबा त्यांच्या व्यस्त दिनक्रमातही आमची चौकशी करतात. आमच्या प्रकृतीविषयी चौकशी करून आमच्या करिअरसाठी आम्हाला प्रोत्साहन देतात”, असंही काई म्हणाली. ती पुढे म्हणाली की, “आजोबा, तुम्ही आमच्यासाठी फार प्रेरणादायी असून माझं तुमच्यावर फार प्रेम आहे.”

हेही वाचा >> डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचं ‘इराण कनेक्शन’ सांगणारी थिअरी काय आहे?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत काय घडलं? (What happened at Trump rally?)

डोनाल्ड ट्रम्प हे पेनासेल्वेनिया या ठिकाणी ट्रूथ सोशल प्लॅटफॉर्मवर बोलत होते. त्याचवेळी त्यांच्यावर गोळीबार झाला. ही गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली. अशात तातडीने ट्रम्प हे खाली वाकले. त्यानंतर सिक्रेट सर्व्हिसचे सुरक्षा रक्षक त्यांच्या भोवती आले. त्यांच्या भोवती कडं तयार करुन त्यांना या ठिकाणाहून बाजूला करण्यात आलं. त्यानंतर जो हल्लेखोर होता त्यालाही ठार करण्यात आलं. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ट्रम्प यांनी त्याबाबत संवेदना व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या अनेक वर्षांपासून काई ट्रम्प सातत्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने उभी राहिली आहे.ट्रम्प गोल्फ कोर्सचे उद्घाटनासारख्या कार्यक्रमांमध्येही ती दिसली आहे.