काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत ५.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले होते. यामुळे दिल्लीसह आसपासचा प्रदेश हादरला होता. ही घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा दिल्लीत भूंकपाचे हादरले जाणवले आहेत. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दिल्लीत २.५ रेश्टर स्केलचा भूंकप झाला आहे. भूकंपाचे धक्के सौम्य असल्याने अनेकांना याबाबत जाणवलं नाही.

पण अवघ्या दोन आठवड्यांच्या आत दिल्ली परिसरात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेत जीवितहानी झाल्याची किंवा पडझड झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळाली नाही.

हेही वाचा- मोठी बातमी: राजधानी दिल्लीत भूकंपाचे धक्के, ५.४ रिश्टर स्केलच्या तीव्रतेनं हादरला परिसर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, आज (मंगळवार) रात्री साडेनऊच्या सुमारास नवी दिल्लीच्या पश्चिम भागातत भूकंपाचे धक्के बसले. हा भूकंप २.५ रिश्टर स्केलचा होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली ५ किलोमीटर आतमध्ये होता. एकाच महिन्यात दोनवेळा भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.