अमेरिकेतील अलास्का पेनिनसुलात भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला. यामुळे हादऱ्यानंतर लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ८.२ इतकी मोजली गेली आहे. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्यातरी कोणत्याच जीवितहानीचं वृत्त नाही. मात्र समुद्र किनाऱ्यावरील शहरे आणि गावांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
अमेरिका जिओलॉजिकल सर्व्हेने रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी ४६.७ किमी खाली भूकंपाच्या धक्क्यांची नोंद केली. यूएसजीएसच्या महितीनुसार कमीत कमी दोन धक्के यावेळी जाणवले. ६.२ आणि ५.६ रिश्टर स्केलचे हे धक्के होते.
An earthquake measuring 8.2 on the Richter scale occurred 91 km east-southeast of Perryville in Alaska: USGS pic.twitter.com/NaZzwVBieC
— ANI (@ANI) July 29, 2021
अलास्का पॅसिफिक रिंग ऑफ फायरमध्ये येतं. त्यात सीस्मिक अॅक्टिव्हीटी सक्रिय असते. उत्तर अमेरिकेत मार्च १९६४ मध्ये सर्वात मोठा भूकंप झाला होता. त्याची तीव्रता ९.२ रिश्टर स्केल इतकी मोजली गेली होती. अँकोरेज, अलास्का खाडी, पश्चिम तटीय भाग आणि हवाई भागाला मोठा धक्का बसला होता. भूकंप आणि त्सुनामीमुळे २५० हून अधिक जणांना जीव गमवावा लागला होता.