गुजरात विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. आज दुपारी १२ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. गुजरातवर गेल्या २५ वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. नुकत्याच झालेल्या मोरबी पूल दुर्घटनेवरुन सत्ताधाऱ्यांना विरोधकांकडून घेरलं जात आहे.

आधी हार्दिक पटेल यांचे सहकारी, आता अरविंद केजरीवालांना साथ; गुजरातमधील पाटीदार नेत्यांचा ‘आप’मध्ये प्रवेश

akola lok sabha marathi news
लोकसभेच्या प्रचारात विधानसभेच्या इच्छुकांची धडपड
odisha assembly elections BJD chief Naveen Patnaik chosen to contest from two seats
ओडिशाचे मुख्यमंत्री दोन जागांवर लढवणार निवडणूक; काय आहेत डावपेच?
Loksabha Election 2024 Equal opportunity for Congress-BJP in South Nagpur
रणसंग्राम लोकसभेचा : दक्षिण नागपुरात काँग्रेस-भाजपसाठी समान संधी; जाणून घ्या सविस्तर…
vanchit bahujan aghadi yavatmal marathi news, abhijeet rathod vanchit bahujan aghadi
यवतमाळमध्ये ‘वंचित’चा उमेदवार निवडणुकीपासून ‘वंचित’च; उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास…

केंद्रीय निवडणूक आयोगाने १४ ऑक्टोबरला हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्याचवेळी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र, त्यावेळी आयोगानं या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या नाहीत.

विश्लेषण : गुजरात निवडणुकांच्या तारखांबाबत आयोगानं केली २०१७ची पुनरावृत्ती; काय घडलं होतं पाच वर्षांपूर्वी?

गुजरात विधानसभेची मुदत १८ फेब्रुवारी २०२३ मध्ये संपत आहे. १८२ सदस्य संख्या असलेल्या गुजरात विधानसभेत १११ आमदार भाजपाचे आहेत. याशिवाय काँग्रेसचे ६२ आमदार आहेत. सामान्यत: हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीच्या एकत्रच तारखा जाहीर होऊन मतदान होत असतं. या परंपरेला यावर्षी फाटा देण्यात आला आहे.

हिमाचल प्रदेशच्या निवडणुका अगोदर का?

हिमाचल प्रदेशमध्ये येत्या १२ नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. तर ८ डिसेंबर रोजी निकाल जाहीर केला जाईल. हिमाचल प्रदेश या राज्यामधील बहुतांश प्रदेश हा डोंगराळ आहे. त्यामुळे हवामानाचा मुद्दा लक्षात घेता येथील निवडणूक कार्यक्रम अगोदर घोषित करण्यात आला आहे.