Epstein Files Donald Trump And Elon Musk: उद्योगपती एलॉन मस्क आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. या आरोप-प्रत्यारोपादरम्यान नाव समोर आले ज्यामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष अडचणीत आले. ते नाव होते जेफ्री एपस्टाईन. जेफ्री एपस्टाईनला अमेरिकेत लैंगिक गुन्हेगार म्हणून दोषी ठरवण्यात आले होते. एलॉन मस्क यांनी दोन दिवसांपूर्वी आरोप केला होता की, या प्रकरणाशी संबंधित फायली कधीही सार्वजनिक केल्या गेल्या नाहीत कारण त्यात डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव होते.

मस्क यांनी काल एक्सवर पोस्ट करत म्हटले होते की, “खरोखरच मोठा बॉम्ब टाकण्याची वेळ आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचेही एपस्टाईन फाइल्समध्ये नाव आहे. या फाइल्स सार्वजनिक न होण्याचे खरे कारण हेच आहे. तुमचा दिवस चांगला जावो, डीजेटी!” मात्र, आता एलॉन मस्क यांनी एक्सवरून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हे आरोप करणारी पोस्ट हटवली आहे.

एलॉन मस्क हे ट्रम्प सरकारच्या डोज विभागातून बाहेर पडल्यानंतर आता ते डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मस्क यांनी ट्रम्प सरकारच्या नव्या कर व खर्च विधेयकावर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच याबाबत मस्क यांनी एक्सवर या विधेयकाचा ‘घृणास्पद कृत्य’ असा उल्लेख केला होता. तसेच या विधेयकामुळे खूप तोटा होईल असेही म्हटले होते.

दरम्यान, ट्रम्प प्रशासनाने आणलेल्या नव्या कर विधेयकात इलेक्ट्रिक वाहनांना मिळणारी सूट रद्द करण्यात आल्यामुळे एलॉन मस्क हे नाराज असल्याचे बोललं जात आहे.

मस्क यांच्याबाबत खूप निराश आहे.

एलॉन मस्क यांनी केलेल्या टीकेसंदर्भात बोलताना डोनाल्ड ट्रम्प नुकतेच म्हणाले होते की, “एलॉन मस्क आणि माझे पूर्वी चांगले संबंध होते. पण आता मला माहित नाही की आम्ही एकत्र राहू शकू की नाही? इलेक्ट्रिक-वाहनांवरील कराबाबतच्या निर्णयानंतर टेस्ला प्रमुख निराश झाले असावेत. मी देखील मस्क यांच्याबाबत खूप निराश आहे. मी त्यांना खूप मदत केली”, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्रम्प माझ्यामुळे जिंकले

दरम्यान या वादाला सुरुवात झाले तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत बोलताना एलॉन मस्क यांनी म्हटले होते की, “माझ्याशिवाय ट्रम्प निवडणूक जिंकले नसते. डेमोक्रॅट्सना प्रतिनिधी सभेत बहुमत मिळाले असते आणि रिपब्लिकन पक्षाला सिनेटमध्ये फक्त ५१ किंवा ४९ मतांनी आघाडी मिळाली असती.”