ट्वीटरने इलॉन मस्क यांच्या विरोधात याचिका दाखल केल्यानंतर इलॉन मस्क यांनीही ट्वीटर विरोधात याचिका दाखल केली आहे. त्यांनी १६४ पानांचे एक दस्ताऐवज न्यायालयापुढे सादर करण्यात आले आहे. त्यामुळे ट्वीटर आणि मस्क यांच्यातील कायदेशीर लढाईला सुरूवात झाली आहे. डेलावेअर कोर्ट ऑफ चांसरी कॅथलीन मॅककॉर्मिक १७ ऑक्टोबरपासून पाच दिवस खटला चालवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मस्क यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली.
हेही वाचा – गुजरातमध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजची स्थापना; आता परदेशातून सोन्याची आयात करणे होणार सोपे
इलॉन मस्क हे जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. अंतराळात संशोधन क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी करणारे मस्क हे ट्विटरचे सर्वेसर्वा होतील, अशा चर्चा सुरू होती. एप्रिल महिन्यात त्यांनी तब्बल ४४ अब्ज डॉलर एवढी प्रचंड रक्कम खर्चून ट्विटर खरेदी करत असल्याचे जाहीर केले होते. ट्विटरच्या संचालक मंडळानेसुद्धा या व्यवहाराला मंजुरी दिली होती.
हेही वाचा – मिग-२१ च्या उर्वरित चार स्कॉड्रन २०२५ पर्यंत सेवाबाह्य ; भारतीय हवाई दलाचे आधुनिकीकरण
मात्र, ट्वीटरवरील बनावट खात्यांची पुरेशी माहिती कंपनी देत नाही, त्यामुळे मी हा व्यवहार रद्द करत असल्याचे मस्क यांनी जाहीर केले होते. महत्त्वाचे म्हणजे मजकुरावरील निर्बंध उठवणे तसेच बनावट खाती नष्ट करणे अशा अनेक गोष्टी करणार असल्याचे मस्क यांनी याआधीच स्पष्ट केले होते.