ट्विटर कंपनी एलॉन मस्कने विकत घेतल्यापासून कंपनीच्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. ट्विटरचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे ब्लू टिक बॅच. अनेक राजकारणी, सेलिब्रिटी आणि प्रतिष्ठित लोकांच्या अकाऊंटला ब्लू टिक मिळालेली आहे. अनेक युजर्सना ही ब्लू टिक हवीहवीशी वाटते. एलॉन मस्क यांनी नुकतीच ही ब्लू टिक विकत देण्यास सुरुवात केली आहे. यानंतर कुणीही पैसे देऊन ती विकत घेऊ शकतो. अर्थात भारतात अजूनही ही सेवा उपलब्ध झालेली नाही. पण अनेकजण आपल्या अकाऊंटचे लोकेशन बदलून ही सर्विस विकत घेत आहेत. पण बीबीसीने दिलेल्या बातमीनुसार एक वेगळंच आक्रीत घडलं आहे. तालिबानच्या दहशतवाद्यांनी स्वतःच्या ट्विटर हँडलसाठी ही ब्लू टिक विकत घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटर पेड व्हेरिफिकेशन बॅजसाठी अनेक तालिबानी नेते अर्ज करत आहेत. याचा अर्थ नियमाप्रमाणे पैसे दिल्यानंतर त्यांच्या अकाऊंटला ब्लू टिक मिळेल. सध्या तालिबानचे दोन अधिकारी आणि अफगाणिस्तानमधील कट्टर इस्लामवादी समूहाच्या चार समर्थकांचे ट्विटर हँडल व्हेरिफाईड झाले आहे. त्यांना ब्लू टिक मिळाली आहे. तालिबानच्या एक्सेस टू इन्फॉर्मेशन विभागाचे प्रमूख हिदायतुल्लाह हिदायत यांचे अकाऊंट व्हेरिफाईड झाले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elon musk is selling blue ticks on twitter now taliban is buying verified badge kvg
First published on: 18-01-2023 at 12:24 IST