Elon Musk : एलॉन मस्क यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये मस्क एक हाथ एका बाजूने उंचावून सॅल्युट करताना दिसत आहेत. या सॅल्युटला नाझी सॅल्युट असं म्हटलं जातं. हा व्हिडीओ सोमवार २० जानेवारीचा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्या दरम्यान एलॉन मस्क यांनी नाझी सॅल्युट केल्याची चर्चा आहे. या सॅल्युटची तुलना हिटलरच्या सॅल्युटशी केली जाते आहे. तसंच मस्क यांच्या कृत्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

मस्क यांनी नेमकं काय केलं?

एलॉन मस्क या शपथविधी सोहळ्यात सहभागी झाले होते. ते म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेला विजय हा काही सामान्य विजय नाही. तुम्ही सगळ्यांनी जे घडवून आणलंत त्यासाठी मी तुमचे आभार मानतो, खूप खूप धन्यवाद. असं मस्क म्हणाले आणि त्यांनी त्यांचा उजवा हात छातीजवळ घेतला आणि नंतर तो बाहेर काढला. ही कृती अशी होती की जणू काही ते कुणाला तरी सॅल्युट करत आहेत. यावरुन मस्क यांच्यावर टीका केली जाते आहे.

एलॉन मस्क यांच्या सॅल्युटमुळे सोशल मीडियावर खळबळ

एलॉन मस्क यांच्या सॅल्युटमुळे त्यांच्यावर प्रचंड टीका केली जाते आहे. सोशल मीडियावर लोकांनी मस्क यांची तुलना हिटलर आणि नाझी लोकांशी केली आहे. त्यावर उत्तर देत मस्क म्हणाले की खरं सांगायचं तर सगळेच हिटलर आहेत. ही टीका आता जुनी झाली आहे. अमेरिकेतले इतिहासकार Ruth Ben Ghiat यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात एलॉन मस्क यांनी केलेली कृती म्हणजे नाझी सॅल्युट होता असं म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एलॉन मस्क यांनी केलेली कृती म्हणजे नाझी सॅल्युट वगैरे नाही. असं एक दुसरे इतिहासकार अॅरॉन अॅस्टर यांनी म्हटलं आहे. तसंच एका सोशल मीडियावरही मस्क यांचा बचाव करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी जी कृती केली तशी कृती आधी बराक ओबामा, हिलरी क्लिंटन यांचेही अशीच कृती करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत.