जम्मू काश्मिरमधील बडगाम भागात बुधवारी (१० ऑगस्ट) पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सैन्याने लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांची नाकेबंदी केली आहे. यात कुप्रसिद्ध लतिफ रादर या दहशतवाद्याचाही समावेश आहे. त्याच्यावर राहुल भट, अमरीन भटसह अनेक नागरिकांच्या हत्येचा आरोप आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईबाबत माहिती देताना काश्मीर विभागीय पोलिसांनी सांगितलं, “बडगाममध्ये सुरक्षा दल आणि लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना घेरलं आहे. हे दहशतवादी राहुल भट, अमरीन भटसह अनेक नागरिकांच्या हत्येत सहभागी होते.”
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
पहाटेपासून बडगाममधील वॉटरहेलमध्ये ही चकमक सुरू आहे. पुढील माहितीची प्रतिक्षा आहे.