पुणे : भारताला स्वत:चे असे एक कथानक असणे आवश्यक आहे. ‘ग्लोबल साऊथ’ हे त्याचे उत्तम उदाहरण असून, आता भारत हा ‘ग्लोबल साऊथ’चा चेहरा झाला आहे. यापूर्वी कधीही वापरला न गेलेला हा शब्द आधी आता तो भारताला उद्देशून वापरला जात आहे, असे परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शनिवारी सांगितले. आगामी ५० वर्षांतील जग हे आपण गेल्या ५० वर्षांत पाहिलेल्या जगापेक्षा पूर्णपणे वेगळे असेल. हे अर्धशतक भारताचा अमृतकाळ असेल, असेही त्यांनी सांगितले.

सिंबायोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज आणि सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय संबंध परिषदेचे उद्घाटन डॉ. एस. जयशंकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. राधाकृष्णन रमण आणि सिंबायोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजच्या संचालक  प्रा. शिवाली लवळे या वेळी उपस्थित होत्या.

हेही वाचा >>>Uttarkashi Tunnel Rescue : अमेरिकन तज्ज्ञांच्या वक्तव्याने चिंता वाढल्या; म्हणाले, “मजुरांच्या सुटकेसाठी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. जयशंकर म्हणाले, इतर देशांतील लोक जागतिक बाजारपेठेबद्दल बोलतात. परंतु,  जागतिक कार्यस्थळाबद्दल बोलतो. भारतीयांसाठी राष्ट्रीयीकरण आणि आंतरराष्ट्रीयीकरण या दोन वेगळय़ा गोष्टी नाहीत. कारण वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेवर आपला विश्वास आहे. आपण यापूर्वी न स्वीकारलेले वेगवेगळे मार्ग स्वीकारले पाहिजेत. भूतकाळात पर्याय आणि विचार प्रक्रिया अस्तित्वात होती. पण, आता आपण   स्वत:च्या नोंदींचे गंभीरपणे परीक्षण करणे आवश्यक आहे. अनेकविध संकल्पना आपल्या संस्कृतीत आहेत. पण,  त्याकडे वेगळय़ा दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. भारत जगाला कुटुंब मानतो, हे जी-२० देशांच्या मनात ठसले आहे.