एपी, वॉशिंग्टन : पृथ्वीवरील सर्वात दुर्गम आणि निर्जन ठिकाणांपैकी एक असलेल्या अंटार्क्टिका या दक्षिण ध्रुवीय प्रदेशालाही जागतिक हवामानबदलाचा दुष्परिणाम जाणवू लागला आहे. तेथे आता तापमानाच्या चढ-उतारांच्या विस्कळीत नोंदी होत आहेत. तसेच लहरी हवामानाचे प्रमाण वाढले आहे.

मानवाने केलेल्या प्रदूषणामुळे झालेल्या हवामान बदलाची झळ या सुदूर दक्षिण ध्रुवीय प्रदेशालाही बसत आहे. हवामान बदलाची झळ बसलेल्या आगळय़ावेगळय़ा भौगोलिक स्थळांच्या सुसंगत नोंदी करणारी विज्ञानपत्रिका ‘फ्रंटियर्स इन एनव्हायर्नमेंटल सायन्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका नवीन संशोधन अहवालानुसार अंटार्क्टिकाच्या पश्चिमेकडील टोकाला आणि विशेषत: द्वीपकल्पात बर्फाचा थर मोठय़ा प्रमाणात वितळताना दिसला आहे.

pune ranks among the forgetful passengers
विसरभोळ्या प्रवाशांमध्ये पुणेकर देशात पाचव्या स्थानी! जाणून घ्या कोणत्या वस्तू विसरतात…
Finance Ministry report predicts a comforting dip in inflation amid forecasted monsoon rains
महागाईत दिलासादायी उताराचा अंदाज; मोसमी पावसाच्या अनुमानाच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाचा अहवाल
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?

परिणामी पुढील काही शतकांत समुद्राच्या पातळीत मोठय़ा प्रमाणात वाढ होण्याचा धोका आहे. तर पूर्वेकडील भागात बर्फाचे प्रमाण अनियमितरीत्या वाढत आहे. एक पश्चिम हिमनदी इतक्या वेगाने वितळत आहे की शास्त्रज्ञांनी तिचे ’प्रलयकालीन हिमनदी’ (डूम्स डे ग्लेशियर) असे नामकरण केले आहे आणि त्यावर बारकाईने लक्ष ठेवून, त्यामुळे होणारे परिणाम अभ्यासण्याचे आंतरराष्ट्रीय प्रयत्न सुरू आहेत. अंटार्क्टिका सागरातील बर्फ पूर्वी कधीही नव्हे एवढा उच्चांकी प्रमाणात कमी झाला आहे. बर्फ घटण्याचे प्रमाण खूप जास्त व धक्कादायक आहे.

हा प्रकार असाच चालू राहिल्यास आणि मानवी हस्तक्षेपामुळे वाढलेल्या प्रदूषणामुळे मोठय़ा प्रमाणात कार्बन उत्सर्जन रोखण्यात अयशस्वी ठरलो तर एकामागून एक येणारे संभाव्य दुष्परिणाम भीषण असतील. सूर्यप्रकाश प्रतिबिंबित करणारा बर्फाचा फार मोठा भाग त्यामुळे नष्ट होईल. जागतिक तापमानवाढ होण्याचे ते एक कारण ठरेल. तसेच वितळलेल्या बर्फाने विद्यमान किनारपट्टीचे प्रदेश पाण्याखाली जातील. शास्त्रज्ञ दीर्घ काळापासून येथील हवामान बदलाचे निरीक्षण करत आहेत. हे बदल पाहून ते चिंतित असून, त्यांनी वारंवार तसे इशारेही दिले आहेत.

वसुंधरेसाठी वाईट बातमी

‘‘असा बदलत असलेला अंटार्क्टिकाही आपल्या वसुंधरेसाठी वाईट बातमी आहे. अंटार्क्टिकावर घडणाऱ्या टोकाच्या अतितीव्र घटनांमागील कारणे समजून घेण्यासाठी केलेल्या अभ्यासात असे आढळले, की एकेकाळी जागतिक तापमानवाढीच्या दुष्परिणामांपासून काहीशा संरक्षित असलेल्या अंटार्क्टिकाला हवामान बदलांचा आता फटका बसत आहे. हा महाद्वीप आता गोठलेला स्थिर महाकाय खंड उरला नाही. हवामान बदलाचे दुष्परिणाम येथे अनपेक्षितपणे ठिकठिकाणी जाणवू लागले आहेत.’’ – मार्टिन सिगर्ट, हिमनदीतज्ज्ञ