Neil Gaiman sexual assault allegations: प्रसिद्ध ब्रिटिश लेखक नील गैमन यांच्यावर आठ महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. न्यूयॉर्क पाशिकाने “देअर इज नो सेफ वर्ड” या शीर्षकाखाली लेख छापला असून या लेखात अनेक महिलांनी स्वतःवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. आठही महिलांनी गैमन यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांनी गैरवर्तन केल्याचे म्हटले आहे. तसेच गैमन आणि त्यांची आधीची पत्नी अमांडा पाल्मर यांच्याकडे आया म्हणून काम करणाऱ्या स्कार्लेट पाव्हलोविच यांचाही समावेश आहे.

स्कार्लेट पाव्हलोविच म्हणाल्या की, मी २२ वर्षांची असताना २०२२ साली गैमन यांच्या घरी कामासाठी आले होते. त्यांच्या पाच वर्षांच्या मुलाला सांभाळण्याचे काम करत असताना गैमन यांनी पहिल्या दिवसापासून माझ्यावर अत्याचार केले. पाव्हलोविच यांच्या दाव्यानुसार, त्यांच्या न्यूझीलंडमधील घरी त्या बाथटबमध्ये असतानाच गैमन यांनी घुसखोरी केली. मी त्यांना मास्टर म्हणावे, असे ते मला वारंवार सांगत होते. माझे शोषण करत असताना, मला ते मास्टर म्हणून हाक मारण्यास सांगत होते. तसेच तू चांगली मुलगी आहे, चांगली बनून राहा, असा दबाव टाकत होते.

त्यांच्या मुलासमोरच माझ्यावर लैंगिक अत्याचार

माझ्या कुटुंबासाठी मला कामाची गरज होती. म्हणून मी त्यांचे अत्याचार सहन करत काम करत राहिले, असेही पीडित पाव्हलोविच यांनी सांगितले. या काळात गैमन यांनी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचाही दावा पीडितेने केला आहे. कधी कधी तर त्यांचा अत्याचार सहन करण्यापलीकडे जायचा, एकदा तर मी बेशूद्धच पडले, असेही पाव्हलोविच यांनी सांगितले. गैमन हे अतिशय विकृत असून त्यांनी मला त्यांच्या घरातील कचरा खायला सांगितला होता, असाही धक्कादायक दावा त्यांनी केला.

एकदा बाहेरगावी असताना एका हॉटेलमध्ये त्यांनी त्यांच्या लहान मुलासमोरच माझ्यावर बलात्कार केला, असाही आरोप पाव्हलोविच यांनी केला आहे. इतर महिलांनीही गैमन यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गैमन यांनी काय म्हटले?

अनेक महिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप केले असले तरी लेखक गैमन यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. हे सर्व आरोप असत्य आणि बिनबुडाचे असल्याचा दावा गैमन यांच्या वकिलांच्या मार्फत करण्यात आला आहे. टॉर्टाइज मीडियाने जुलै २०२४ रोजी ‘मास्टर’ नावाने एक पॉडकास्ट सीरीज प्रदर्शित केली होती. ज्यामध्ये दोन महिलांनी आरोप केले होते. या सीरीज नंतर आणखीही महिला समोर आल्या आहेत.