विश्वचषक २०१९ मधील उपांत्य फेरीतील पहिल्याच सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर भारतीय संघाने डीआरएस गमावला. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भुवनेश्वर कुमारने भारतासाठी गोलंदाजीची सुरूवात केली.  न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलला भुवनेश्वरने टाकलेला पहिलाच चेंडू त्याचा पॅडला लागला. भुवनेश्वरने अपील केल्यानंतर पंचानी त्याला नाबाद दिले. त्यावेळी भुवनेश्वरने डीआरएस घेण्याचा सल्ला दिल्यानंतर भारतीय संघाने पहिल्याच चेंडूवर घेतला. मात्र, तिसऱ्या पंचाने चेंडू स्टम्पला लागत नसल्याचे सांगत मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवत गप्टिलला नाबाद ठरवले आणि भारतीय संघाने पहिल्याच चेंडूवर डीआरएस गमावला. भुवनेश्वर कुमारने पहिलेच षटक निर्धाव टाकले मात्र अती घाई केल्याने डीआरएस गमावला. या पहिल्याच चेंडूवरील डीआरएसची सोशल नेटवर्किंगवर चांगलीच चर्चा सुरु आहे.

अनेकांनी या डीआरएससाठी कर्णधार विराट कोहली आणि अचूक डीआरएससाठी प्रसिद्ध असलेला महेंद्रसिंग धोनी सहमत नसल्याचे म्हटले आहे. तरी भुवनेश्वरच्या सांगण्यावरुन डीआरएस घेतला आणि तो आपण गमावला अशी खंत अनेकांनी व्यक्त केली आहे. पाहूयात काय आहे नेटकऱ्यांचे म्हणणे…

बुमराहची रिअॅक्शन

भाई हा तर

जेव्हा मतभेद होतो

काय बघणार

सहन करु थोडं

त्याच्यासाठी का घालवला रिव्ह्यू

मोठा तोटा

चेन्नई- मुंबई सामन्यासारखं होणार का?

आधी नाणेफेक आणि नंतर डीआरएस

विराटचा डीआरएस आणि…

हा विश्वविक्रम असेल का

पहिल्याच चेंडूत गमावला

धोनीवर का अवलंबून रहायचं

गोलंदाजांवर विश्वास ठेऊ नये

चार विकेट किपर, पाच गोलंदाज आणि शून्य रिव्ह्यू

विरोधक आनंदात

दरम्यान उपांत्य फेरीचा दुसरा सामना ११ जुलै रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान होणार आहे. त्यामुळेच आजचा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीमध्ये ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडशी लढेल.