Father-in-law tips off cops about daughter-in-law booze party Crime news : गुजरातमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे सुनेच्या दारूच्या पार्टीची टिप सासऱ्याने पोलिसांना दिल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित पार्टीची माहिती मिळाल्यानंतर सुरतच्या डुमस पोलिसांनी ‘विकेंड एड्रेस’ नावाच्या एका हॉटेलात चाललेल्या एका पार्टीवर छापेमारी केल्याची घटना समोर आली आहे. या पार्टीमध्ये कथितपणे मद्य दिले जात होते असा आरोप असून याप्रकरणी चार पुरूष आणि दोन महिलांना अटक करम्यात आली आहे. अटक करण्यात आलेले सर्वजन हे २३ ते २५ वर्षे वयोगटातील आहेत.

विशेष बाब म्हणजे सुरत पोलिसांच्या कंट्रोल रुमला एका व्यक्तीने फोन करून त्याची सून खोली क्रमांक ४४३ मध्ये सुरू असलेल्या एका दारू पार्टीत गेल्याची माहिती दिली होती. त्यानंतर डुमस पोलिसांनी या खोलीवर छापा टाकला आणि आरोपींनी दारूच्या बाटल्यांसह रंगेहाथ पकडले. अटक करण्यात आलेल्या दोन्ही महिला या कलाकार आहेत तर पुरुष हे प्रोफेशनल आणि व्यावसायिक आहेत.

दारूची अर्धी बाटली जप्त

सर्व आरोपी ही नशेत होते, असा आरोप आहे. पोलिसांनी चार ग्लास आणि अर्धी भरलेली मद्याची बाटली जप्त केली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या आरोपींनी फ्रेंडशीप डे साजरा करण्यासाठी खोली भाड्याने घेतली होती. पोलिसांनी त्यांना सरकारी रुग्णालयात नेले आणि तेथे अल्कोहोल तपासण्यासाठी त्यांच्या रक्ताची चाचणी घेण्यात आली.

आम्हाला माहिती कळाली की माहिती देणाऱ्याचा मुलगा हा अटक केलेल्या एका महिलेचा पती आहे. जोडप्यामध्ये काही वाद सुरू आहेत, त्यामुळे माहिती देणाऱ्याला या महिलेला धडा शिकवायचा होता. त्याने महिलेचा पाठलाग सुरू केला आणि या संबंधित पार्टीबद्दल त्याला समजले. त्यानंतर त्याने याबद्दल पोलिसांना माहिती दिली, असे अधिकाऱ्याने सांगितले.

खोली भाड्याने देण्यासंबंधी पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या सूचनांचे पालन न करताचा हॉटेलमधील रूम भाड्याने घेण्यात आली होती, असेही पोलिसांच्या लक्षात आले.

हॉटेलमधील ४६४ खोल्यांपैकी अनेक या खाजगी व्यक्तींच्या मालकीच्या आहेत, जे भाडे करारावर खोल्या भाड्याने देतात. खोली भाड्याने घेणारा व्यक्ती या खोल्या इतरांना जास्त दराने भाड्याने देतो. त्याचा करार संपलेला असल्याने पोलीस खोली मालकाच्या विरोधात स्वतंत्र्य तक्रार दाकल करतील, असे सहायक पोलीस आयुक्त दीप वकिल म्हणाले.

दरम्यान कौटुंबिक वादामुळे पार्टी बंद पाडण्यात आल्याने पोलीस या प्रकरणाचा काळजीपूर्वक तपास करत आहेत. माहिती देणाऱ्याला पार्टीबद्दल कसे समजले याचा पोलीस तपास करत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. “महिला विशिष्ट रूममध्ये असल्याबद्दल त्याला माहिती कशी मिळाली याबद्दल आम्ही माहिती देणाऱ्याचा जबाब घेऊ. तो तिचा पाठलाग करत होता की त्याने तिच्या हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी कोणालातरी तैनात केले होते? यामुळे चौकशीत मदत होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.