करोनामुळे अनेकांना कठीण परिस्थितीचा सामाना करावा लागत आहे. या काळात अन्य आजारावर उपचार घेणे देखील अवघड झाले. लॉकडाउनमुळे तर ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेचे तिनतेरा वाजले आहेत. करोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कर्नाटकमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. दरम्यान, कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यातील कोप्पलू गावातून भावनिक बातमी समोर आली आहे. कोप्पलू गावातील रहिवासी असलेल्या ४५ वर्षीय आनंद आपल्या मुलाच्या औषधांसाठी सलग तीन दिवस सायकल चालवत बंगळुरूला गेले.

आनंद यांनी आपल्या मुलासाठी ३०० किलोमीटर सायकलने प्रवास केला. त्यांच्या मुलाला औषधांची आवश्यकता होती. लॉकडाउनमुळे गावात औषधे नव्हती. त्यामुळे आनंदने साहसी निर्णय घेतला. आजूबाजूचा लोकांनी आनंदच्या धैर्याचे कौतुक केले. कुलीचं काम करणाऱ्या आनंदने आज खरोखर ‘कुली नंबर १’ असल्याचे सिद्ध केले.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हैसूर जिल्ह्यातील कोप्पलू गावातील रहिवासी आनंद हा कुलीचे काम करतो आणि आपल्या  कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्यांचा मुलगा भैरश याच्यावर बेंगळुरू येथील निमहंस हॉस्पिटलमध्ये गेल्या १० वर्षांपासून उपचार सुरू आहेत. त्यांच्या मुलाचे औषधही बंगळुरूमध्येचं उपलब्ध आहेत. औषध न मिळाल्यास मुलाची तब्येत ढासळते.

करोना साथीच्या आधी ते दर दोन महिन्यांनी बंगळुरू औषधे आणण्यासाठी जात होते. पण करोना साथीच्या रोगामुळे लॉकडाउन लावण्यात आला. त्यामुळे आनंद बंगळुरूला जाऊ शकत नव्हते. घरातील औषधे देखील संपली होती. अशा परिस्थितीत आनंदने जुन्या सायकलने औषध आणण्यासाठी बंगळुरूला जाण्याचा निर्णय घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आनंद २३ मे रोजी आपल्या घरून बंगळुरुसाठी निघाले. यानंतर तेथून औषध घेतल्यानंतर ते २६ मे रोजी संध्याकाळी परत आले. जेव्हा गावातील लोकांना हे कळले तेव्हा त्यांनी वडील आणि मुलाच्या प्रेमाचे आणि आनंदच्या धैर्याचे कौतुक केले.