उत्तर ग्रीसमध्ये रेल्वे अपघाताची एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शेकडो लोकांना घेऊन जाणाऱ्या एक प्रवासी रेल्वेने समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू रेल्वेला धडक दिली आहे. या अपघातानंतर रेल्वेचे अनेक डबे लोहमार्गावरून घसरले आहेत. तर अनेक प्रवासी खिडकीमधून बाहेर फेकले आहेत. या दुर्दैवी अपघातात ३२ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ८५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातानंतर रेल्वेचे काही डबे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. याबाबतची माहिती स्थानिक अधिकाऱ्याने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी मध्यरात्री उत्तर ग्रीसमधील टेम्पे शहराजवळ हा अपघात झाला. दोन रेल्वेची समोरासमोर धडक झाल्याने अनेक डबे रुळावरून घसरले तर किमान तीन डब्यांना आग लागली. अपघाताची माहिती मिळताच बचाव दलाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी पहाटे घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना बाहेर काढण्याचं काम केलं.

हेही वाचा- प्रवाशांचा रेल्वे रूळातून जीवघेणा प्रवास; ट्रान्स-हार्बरमार्गावर आतापर्यंत रेल्वे अपघातात १२३ जणांचा मृत्यू

ग्रीक अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. सध्याच्या घडीला १७ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि ४० रुग्णवाहिका आणि किमान १५० अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्य करत आहेत, अशी माहिती ग्रीक अग्निशमन दलाचे प्रवक्ते वॅसिलिस वार्थकोगियानिस यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fiery railway crash in greece kills 32 and 85 injured after 2 speedy trains collide rmm
First published on: 01-03-2023 at 20:25 IST