सिंघल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा – करात

विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी मुलाखतीद्वारे अल्पसंख्य समुदायाला धमकावल्याचा आरोप माकपच्या नेत्या वृंदा करात यांनी केला आहे.

विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी मुलाखतीद्वारे अल्पसंख्य समुदायाला धमकावल्याचा आरोप माकपच्या नेत्या वृंदा करात यांनी केला आहे. सिंघल यांच्या विरोधात प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. केंद्रात बहुमत मिळाल्याने तुम्ही अशी धमकी देत आहात काय, असा सवाल त्यांनी केला आहे. सिंघल यांनी एका मुलाखतीत याबाबतचे मत व्यक्त केल्याचा दावाही करात यांनी केला
आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: File fir against ashok singhal prakash karat