scorecardresearch

करोनाचा कहर सुरुच! देशात सलग तिसऱ्या दिवशी आढळले ५० हजारापेक्षा अधिक रुग्ण

गेल्या २४ तासात ५१ हजार ६६७ नवीन बाधितांची नोंद झाली आहे. तर १३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

For the third day in a row, more than 50,000 patients were found in the country
आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आकडेवारी (प्रातिनिधीक फोटो)
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. मात्र नव्याने आढळलेल्या डेल्टा प्लस करोनाच्या नवीन प्रकारामुळे चिंतेचे वातावरण आहे. डेल्टा प्लस मुळे तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी ५० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळले. गेल्या २४ तासात ५१ हजार ६६७ नवीन बाधितांची नोंद झाली आहे. तर १३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुjवारी देशात ५४ हजार ६९ करोना बाधित आढळले होते.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४  तासांत ५१.६६७ नवीन करोनाचे रुग्ण आढळले. तसेच १,३२९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ६४,५२७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सध्या देशात ६,१२,८६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

हेही वाचा- करोनाचा महिला आणि तरुण नोकरदारांना सर्वाधिक फटका! ‘लिंक्डइन’च्या सर्वेक्षणातील चिंताजनक माहिती

देशात करोनामुळे मृत्यूचे प्रमाण १.३० टक्के आहे, तर रिकवरी रेट ९६ टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय प्रकरणे सुमारे २ टक्के आहेत. करोना अ‍ॅक्टिव्ह केसेसच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. संसर्ग झालेल्या एकूण संख्येच्या बाबतीतही भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. जगात अमेरीका, ब्राझीलनंतर करोनामुळे सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.

आतापर्यंत भारतात तीन कोटी ३ लाख ३४ हजार ४४५ रुग्ण आढळले. यापैकी दोन कोटी ९१ लाख २८ हजार २६७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर ६ लाख १२ हजार ८६८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तसेच ३ लाख ९३ हजार ३१० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: For the third day in a row more than 50000 patients were found in the country srk

ताज्या बातम्या