भारतात ईव्हीएम यंत्रावर आजवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. अनेक संघटना आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ईव्हीएमला हटविण्यासाठी आंदोलने केली आहेत. आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या जगविख्यात कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क यांनीही ईव्हीएमविरोधात भूमिका घेतली आहे. ईव्हीएम यंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एआय किंवा मानवांकडून हे यंत्र हॅक केले जाऊ शकते, अशी शक्यता त्यांनी वर्तविली आहे. त्यामुळे याचा वापर करू नये, असा सल्लाही एलॉन मस्क यांनी दिला आहे. यानंतर आता भाजपाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मस्क यांना प्रत्युत्तर दिले आहे.

एलॉन मस्क हे प्रभावशाली व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांनी एखादी भूमिका मांडल्यानंतर त्यावर जगभरात चर्चा होते. त्यामुळेच त्यांनी स्वतःच्या एक्स या सोशल मीडियावरून केलेल्या पोस्ट चर्चेत असतात. आता त्यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे पुन्हा एकदा भारतीय निवडणुकांकडे पाहिले जात आहे.

“महाराष्ट्रात धर्मनिरपेक्षता नको आहे, हिंदुत्व हवंय”, भाजपा आमदाराचं विधान; म्हणाले, “४०० पार झाले असते, तर…”

अमेरिकेच्या निवडणुकीतील स्वतंत्र उमेदवार रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांनी ईव्हीएमबाबत एक पोस्ट टाकली होती. त्या पोस्टला घेऊनच एलॉन मस्क यांनी आपली शंका उपस्थित केली. अमेरिकेत यावर्षी राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. यावेळी पुन्हा एकदा डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आमनेसामने येण्याची शक्यता आहे. याआधी २०२० मध्ये हे दोन्ही नेते समोरासमोर आले होते.

“मोदीजी आता तुम्हीच…”, इस्रायल-हमास युद्धादरम्यान पॅलेस्टाईनच्या पंतप्रधानांचे पत्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एलॉन मस्क यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह केल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे. “मस्क यांची टिप्पणी ही खूपच वरवरची आणि सामान्यीकरण असलेली आहे. याचा अर्थ असा होतो की, कुणीच सुरक्षित हार्डवेअर करू शकत नाही का? मला वाटतं हे साफ चुकीचं आहे. एलॉन मस्क यांची शंका अमेरिका आणि इतर देशांत कदाचित खरी ठरत असेल. पण भारतात ईव्हीएममध्ये काही विशेष बदल करण्यात आले आहेत. यात सुरक्षिततेचे सर्व उपाय आहेत. आमच्या यंत्रात ब्लूटूथ, वाय-फाय, इंटरनेट यासारखी कोणतीही कनेक्टिव्हीटीची सुविधा नाही. भारतासारखेच ईव्हीएम इतर लोकही बनवू शकतात. एलॉन मस्कला सांगू इच्छितो की, हवं तर आम्ही त्यांसाठी शिकवणी वर्ग घेऊ शकतो”, असा टोला राजीव चंद्रशेखर यांनी लगावला.