चेन्नई :तमिळनाडूत मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या दुर्घटनांत चार जणांचा मृत्यू ओढवला असून ६० हून अधिक घरांचे नुकसान झाल्याची माहिती सोमवारी अधिकाऱ्यांनी दिली. पावसामुळे अनेक धरणांतून पाणी सोडण्यात आले असून महामार्गाना नद्यांचे स्वरूप आले आहे. पुंडी, चोलावरम, पुझल, चेंबरमबक्कम ऐआणि थेरवी कंडीगाई आदी धरणांतून अतिरिक्त पाणी सोडण्यात आले आहे. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. चेन्नईतील अनेक भागांत दोन फुटांहून अधिक पाणी साचले होते. अनेक भागांतील वीजपुरवठा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बंद ठेवण्यात आला होता. गेल्या २४ तासांत चेन्नई, थेनी आणि मदुराई जिल्ह्यांत पावसाने चार जणांचा बळी गेला, तसेच १६ गुरांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.