गोव्यातील झुआरी पुलावरुन एक चारचाकी गाडी नदीत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. दरम्यान, १२ तासांच्या प्रयत्नांनंतर ही चारचाकी गाडी नदी पात्रातून बाहेर काढण्यात आली आहे.
झुआरी पुलावरुन बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक चारचाकी गाडी भरधाव वेगात जात होती. यावेळी चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने पुलाच्या कठड्याला जब्बर धडक बसली. त्यामुळे पुलाचा कठडा तुटूल्याने गाडी थेट नदीन जाऊन पडली. या घटनेची माहिती मिळताच तटरक्षक दल आणि नौदल डायव्हर्सनी घटनास्थळी दाखल होत बचवा कार्य सुरू केले.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान, १२ तासाच्या प्रयत्नांनंतर ही चारचाकी गाडी बाहेर काढण्यात आली. तर या अपघातात गाडीतील चौघांचाही बुडून मृत्यू झाला आहे. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.