येथील हस्तिनापूर परिसरात झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर एका ५० वर्षीय व्यक्तीने विषारी घटक सेवन करून आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.
आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव बारू असे असून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची खबर मिळताच पोलिसांनी तातडीने त्याला नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र वाटेतच तो मरण पावला, असे पोलिसांनी सांगितले.
आपल्या मुलीवर बारू आणि त्याचे नातेवाईक अरुण आणि सुधीर यांनी बलात्कार केल्याची तक्रार बारूच्या शेजाऱ्याने केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आल्याने आपले वडील तणावाखाली होते, बलात्कार केल्याची खोटी तक्रार नोंदविण्यात आली होती, असे बारू यांचा मुलगा अखिलेश याने सांगितले.
अखिलेश याने एक महिला, तिचा पती आणि अन्य तिघांविरुद्ध तक्रार नोंदविली आहे. आपल्या वडिलांवर खोटे आरोप करून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप अखिलेश याने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gangrape accused commits suicide in up
First published on: 09-05-2015 at 01:38 IST