Gangster Marries Don, Police Provide Security: ‘काला जथेरी’ या नावाने प्रसिद्ध असलेला कुख्यात गुंड संदीप १२ मार्च रोजी दिल्लीतील द्वारका परिसरात कडेकोट बंदोबस्तात ‘लेडी डॉन’ अनुराधा चौधरीसह लग्न करणार आहे.विशेषतः म्हणजे डॉन व गुंडांच्या लग्न सोहळ्याच्या सुरक्षेसाठी सुमारे १५० -२०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. दिल्लीच्या द्वारका कोर्टाने गँगस्टर काला जथेरीला त्याच्या विवाहसोहळ्यासाठी पॅरोलवर रजा मंजूर केली आहे. १२ मार्च रोजी द्वारका परिसरातील बँक्वेट हॉलमध्ये सकाळी १० ते ४ या वेळेत हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

कुठे व कधी होणार लग्न?

फ्री प्रेस जर्नलने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची SWAT टीम, थर्ड बटालियन, स्पेशल स्टाफ आणि स्थानिक पोलिसांची टीम या दोघांच्या लग्नासाठी तैनात केली जाणार आहे. याशिवाय, बँक्वेट हॉलच्या मालकाला संपूर्ण आवारात सीसीटीव्ही बसवण्यास सांगितले आहे. जथेरीने आपल्या लग्नासाठी ‘मानवतावादी’ आधारावर पॅरोलवर रजेची मागणी केली होती जी मान्य करण्यात आली असून द्वारका न्यायालयाच्या आदेशानुसार, या गुंडांचे लग्न अवघ्या सहा तासांच्या कालावधीत सक्तीचे वेळापत्रक पाळून पूर्ण होणार आहे.

वधूचा ‘गृह प्रवेश’ सोहळा १३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता हरियाणातील सोनीपतमधील जथेरी गावात निश्चित करण्यात आला आहे. गेल्या सोमवारी, न्यायालयाने गुंड काला जथेरीला त्याच्या विवाह सोहळ्यासाठी पॅरोल मंजूर केला.

हे ही वाचा<< “मिनी स्कर्ट, पर्स आधुनिक नाही तर.. “, मोदींचं नॅशनल क्रिएटर अवॉर्ड सोहळ्यात मोठं विधान; म्हणाले, “कोणार्कला..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुन्हेगाराला लग्नासाठी रजा कशी मिळाली?

अधिवक्ता रोहित दलाल यांच्या मार्फत दाखल करण्यात आलेल्या अर्जात ‘विवाहाचा अधिकार’ हा कलम २१ अंतर्गत घटनात्मक अधिकार म्हणून घोषित करण्यात आल्याचे अधोरेखित केले होते. हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या तरतुदींनुसार अर्जदार किंवा आरोपी आणि त्याची होणारी पत्नी हे दोघेही प्रौढ आहेत. त्यामुळे अर्जदार/आरोपींना लग्नास नकार दिल्याने पूर्वग्रह निर्माण होईल आणि भारतीय संविधानाच्या कलम २१ चे उल्लंघन होईल. जथेरी हासंघटित गुन्हेगारी सिंडिकेट चालवल्याप्रकरणी मकोकासह अनेक गंभीर प्रकरणांमध्ये दोषी असून पोलीस कोठडीत आहे.