इंटरनेट जगतातील सर्व नेटकरांच्या लाडक्या गुगल कंपनीने पंधरावा वाढदिवस साजरा केला. गुगल सर्च इंजिन हे नेटकरांचे सर्वाचे लाडके शोध साधन आहे. पंधराव्या वाढदिवसानिमित्त कॅलिफोर्नियातील मेन्लो पार्क येथे सर्व पत्रकारांना कंपनीचा परिसर दाखवण्यात आला. मेन्लो पार्कमधील सुसान वोजसिकी गॅरेजमध्ये लॅरी पेज व सर्जेई ब्रिन यांनी १९९८ मध्ये लावलेल्या छोटय़ाशा गुगलच्या रोपटय़ाचा आता वटवृक्ष झाला आहे. वोजसिकी सध्या गुगल कंपनीच्या उपाध्यक्ष आहेत. गुगल प्लस पेजमध्ये आजच्या निमित्ताने मूळ होम सर्च पेज दाखवण्यात आले आहे तसेच शेकडो वाढदिवस शुभेच्छा त्यात आहेत. गुगल ही जगातील एक मोठी कंपनी असून, केवळ भूतकाळात समाधान मानणारी नाही. त्यांनी त्यांच्या मुख्य शोधयंत्रात सुधारणा केली असून, इतर अनेक उपकरणांवर त्याचा वापर कसा वाढवता येईल याचा विचार केला आहे. १९९८ मध्ये गुगलने तंत्रज्ञानाचे जग नाटय़मयरीत्या बदलून टाकले व सर्च इंजिन म्हणजे शोधयंत्र कायमचे सुधारून टाकले. गुगल सर्चचे प्रमुख अमित सिंघल यांनी त्यांच्या ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे, की गुगलने जग बदलले, अब्जावधी लोक ऑनलाइन आले. इंटरनेटची विक्रमी वाढ झाली. आता तुम्ही तुमच्या खिशातील छोटय़ाशा मोबाइलवर असलेल्या गुगलने कुठल्याही प्रश्नाचे उत्तर शोधू शकता. एवढेच नव्हे, गुगल नाऊच्या रूपाने आवाज ओळखण्याची सुविधा त्यात आहे.
सर्च इंजिन लँड या डॅनी सुलीवान यांच्या ब्लॉगवर म्हटले आहे, की मुख्य सर्च इंजिन म्हणजे शोधयंत्र हे नवीन अलगॉरिथमवर आधारित असून त्याचे सांकेतिक नाव हमिंगबर्ड असे आहे, अतिशय गुंतागुंतीच्या शोध सूचना यात हाताळल्या जातात.
गूगल डूडल-
असेच नवनविन बदल करणाऱया गूगलने आपल्या डूडलच्या माध्यामातून दिवसाचे महत्व सांगणारे होमपेज तयार करण्याची कल्पना यशस्वारित्या सुरू केली आणि ती जगप्रसिद्धही झाली. वाढदिवसाच्या निमित्ताने गूगलने आपल्या डूडलमध्येही वाढदिवसाचा आनंद व्यक्त करणारे चलचित्र तयार केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Sep 2013 रोजी प्रकाशित
नेटकरांच्या लाडक्या गुगलचा पंधरावा वाढदिवस
इंटरनेट जगतातील सर्व नेटकरांच्या लाडक्या गुगल कंपनीने पंधरावा वाढदिवस साजरा केला. गुगल सर्च इंजिन हे नेटकरांचे सर्वाचे लाडके शोध साधन आहे.

First published on: 27-09-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google celebrates its 15th birthday