भारताल ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांची आज जयंती आहे. याची दखल घेते गुगलने खाशाब जाधव यांचं डुडल तयार केलं आहे. या पार्श्वश्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याशिवाय, अद्यापर्यंत खाशाबा जाधव यांचा कामगिरीचा सरकारकडून उचित सन्मान करण्यात आला नसल्याचे म्हणत नाराजीही व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

PHOTOS : ‘महाराष्ट्र केसरी’ची मानाची गदा पटकावण्यासाठी हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत कुस्तीच्या आखाड्यात रंगला थरार!!!

संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे की, “गुगलने दखल घेतली पण सरकारने नाही!, १९५२ साली भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांची आज जयंती. या निमित्त गुगलने खास डूडल तयार करून त्यांना अभिवादन केले आहे. मात्र त्यांच्या कार्याला उचित सन्मान देण्यासाठी सरकार केव्हा जागे होणार, हाच प्रश्न आहे.”

हेही वाचा – महाराष्ट्रातील कुस्तीपटूंसाठी Good News ; राज्य सरकारने वाढवले मानधन, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा!

याचबरोबर, “देशासाठी ऑलिम्पिक पदक मिळविणाऱ्या खेळाडूस सरकारकडून “पद्म” पुरस्काराने सन्मानित केले जाते. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. मात्र ज्यांनी देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले ते पैलवान खाशाबा जाधव अजूनही पद्म पुरस्कारापासून वंचित आहेत.” असंही त्यांनी निदर्शनास आणलं.

हेही वाचा – Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षे ठरला ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी; महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

याशिवाय, “मी खासदार असताना २०१७ ते २०२२ अशी सहा वर्षे सलग, खाशाबांना मरणोत्तर “पद्मविभूषण” मिळावा, यासाठी केंद्रात सर्व पातळीवर वारंवार पाठपुरावा केला, मात्र शेवटी उपेक्षाच झाली. आता तरी सरकारने जागे व्हावे. या महान मल्लावर ऑलिम्पिकच्या मैदानातही अन्याय झाला होता, तरीदेखील देशासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिद्दीने जिंकून आणणाऱ्या खाशाबा जाधव यांना “पद्म” पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा उचित गौरव करणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल.” असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google took notice but not the government when will the government wake up to give proper honor to khashaba jadhav sambhaji raje chhatrapatis question msr
First published on: 15-01-2023 at 15:43 IST