Gujarat Cabinet Reshuffle: गुजरातच्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मंत्रिमंडळात मोठे बदल केले आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या निवासस्थानी एकूण २५ मंत्र्यांनी आज शपथ घेतली. यापैकी दोन आधीचेच मंत्री आहेत. तर आज १९ नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. तर सहा जुन्या मंत्र्यांना पुन्हा संधी दिली गेली आहे. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा उपस्थित होते.
गुजरातच्या एकूण मंत्रिमंडळाची संख्या आता २६ वर गेली आहे. यात मुख्यमंत्र्यांच्याही समावेश आहे. गुजरात विधानसभेतील सदस्यांची संख्या १८२ एवढी आहे. त्यामुळे सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येपैकी १५ टक्के म्हणजे २७ मंत्री असू शकतात.
गुजरातमध्ये २०२७ साली विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तर पुढील महिन्यात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका होत आहेत. त्याच्या काही वेळ आधी मंत्रिमंडळात हा मोठा फेरबदल करण्यात आला आहे.
दोन मंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात आली –
पुन्हा संधी दिलेले मंत्री | मतदारसंघ |
हर्ष संघवी | माजुरा |
प्रफुल्ल पानशेरिया | कामरेज |
ऋषीकेश पटेल | |
कानुभाई देसाई | |
कुंवरजी बावलिया | |
परशोत्तम सोलंकी |
१९ नवे मंत्री खालीलप्रमाणे –
नवीन चेहरे | मतदारसंघ |
जितेंद्र वाघानी | भावनगर पश्चिम |
नरेश पटेल | गांदेवी |
अर्जुन मोढवाडिया | पोरबंदर |
प्रद्युम्न वाज | कोडीनार |
रमण सोलंकी | बोरसाड |
ईश्वरसिंह पटेल | अंकलेश्वर |
मनीषा वकील | वडोदरा शहर |
कांतिलाल अमृतीय | मोरबी |
रमेश कटारा | फतेपुरा |
दर्शना वाघेला | असरवा |
कौशिक वेकारिया | अमरेली |
प्रवीण कुमार माळी | डीसा |
जयराम गमित | निझार |
त्रिकम छंगा | अंजार |
कमलेश पटेल | पेटलाड |
संजयसिंह महिदा | महुधा |
पुनमचंद चनाभाई बरंडा | भिलोडा |
स्वरूप ठाकोर | वाव |
रिवाबा जडेजा | जामनगर उत्तर |
हर्ष संघवी झाले उपमुख्यमंत्री?
४० वर्षीय हर्ष संघवी यांना उपमुख्यमंत्री बनविण्यात आले आहे. मंत्रिमंडळातील हा सर्वात मोठा बदल असल्याचे मानले जाते. राजीनामा देण्यापूर्वी त्यांच्याकडे गृह मंत्रालयाचा कारभार होता. आदल्या दिवशी त्यांनीही सर्व मंत्र्यांसह राजीनामा दिला होता. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
२०१२ साली अवघ्या २७ व्या वर्षी सूरत जिल्ह्यातील माजुरा विधानसभा मतदारसंघातून हर्ष सिंघवी आमदार बनले होते. २०२१ साली त्यांना पहिल्यांदा मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली गेली होती.