निवडणूक आयोगाने भाजपला Gujarat Assembly Election गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘पप्पू’ नावाचा वापर करण्यास आक्षेप नोंदवला आहे. गुजरातमध्ये ९ आणि १४ डिसेंबर रोजी मतदान तर दि. १८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यात प्रमुख लढत ही भाजप आणि काँग्रेस दरम्यान आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने भाजपला एक पत्र पाठवून निवडणूक प्रचाराशी निगडीत वाहिन्यांवरील जाहिराती, होर्डिंग, पोस्टर आणि बॅनर आदिंवर ‘पप्पू’ नावाचा वापर करण्यावर आक्षेप नोंदवला आहे. भाजपने आपल्या प्रचार साहित्यावरून पप्पू नाव हटवण्यास सांगितले आहे. गुजरात निवडणूक आयोगानुसार काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधणे मर्यादेचे उल्लंघन केल्यासारखे आहे. निवडणूक आयोगाने भाजपच्या प्रचार साहित्याचे परीक्षण केल्यानंतर म्हटले की, यामध्ये एका खास व्यक्तिमत्वाकडे इशारा करत ‘पप्पू’ शब्दाचा अपमानजनक वापर केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपने गुजरात निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या प्रचार साहित्यात कोणा एका व्यक्तीचे नाव घेण्यात आलेले नाही. त्यामुळे आयोगाचा हा आदेश योग्य नसल्याचे भाजपने म्हटले आहे. गुजरातमध्ये एकूण १८२ विधानसभा जागा आहेत. बहुमतासाठी ९२ जागांची आवश्यकता आहे. राज्यात मागील दोन दशकांपासून भाजपचे सरकार सत्तेवर आहे. राज्यात मागील तीन विधानसभा निवडणुका (वर्ष २००२, २००७ आणि २०१२) भाजपने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढल्या होत्या. तिन्ही वेळेस भाजपचे सरकार बहुमतात आले होते. वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर राज्यात पहिल्यांदा विधानसभा निवडणुका होत आहेत.

नुकताच पाटीदार नेता हार्दिक पटेलच्या कथित सीडी प्रकरणांमुळे गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यापूर्वी पटेल एका हॉटेलमध्ये जाणारी सीडी माध्यमांत जारी करण्यात होती. या सीडीत हार्दिक राहुल गांधी यांना भेटण्यास गेला होता. तर आयबी आणि गुजरात पोलीस काँग्रेस नेते उतरलेल्या सर्व हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज घेत असल्याचा आरोप काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी केला होता. परंतु, भाजपने सर्व आरोप फेटाळले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujrat assembly election 2017 election commission pappu bjp congress rahul gandhi
First published on: 15-11-2017 at 10:24 IST