गाझा पट्टीतील सत्ताधारी ‘हमास’ या दहशतवादी गटानं शनिवारी पहाटे इस्रायलवर ५ हजार रॉकेट्स डागले. या हल्ल्यात आतापर्यंत ६०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. हमासचे दहशतवादी मजबूत तटबंदी असलेल्या सीमेवरून हवाई आणि समुद्रामार्गे इस्रायलच्या अनेक भागांत घुसले आहेत. या दहशतवाद्यांकडून इस्रायली नागरिकांचा छळ सुरू असल्याचे धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत.

आता हमासच्या दहशतवाद्यांनी एका इस्रायली कुटुंबाला ओलीस ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. क्रूरतेचा कळस म्हणजे कुटुंबासमोरच दहशतवाद्यांनी एका मुलीला फाशी दिली आहे. इस्रायली पत्रकार हनन्या नफ्ताली यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हनन्या नफ्ताली ‘एक्स’ अकाउंटवर म्हणाले, “इस्रायलमधील एका घराचा ताबा घेत हमासच्या दहशतवाद्यांनी कुटुंबाला ओलीस ठेवलं आहे. या कुटुंबातील व्यक्तींचे चेहरे पाहा. हा मानवतेविरोधातील गुन्हा आहे. जागतिक स्तरावरील नेत्यांनी कारवाई करावी, अशी मी मागणी करतो.”

हेही वाचा : “मरण जवळ आलं होतं, शेजारीच…”, दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटलेल्या महिलेची थरारक कहाणी

व्हिडीओत काय?

व्हिडीओत कुटुंबातील चार व्यक्ती दिसत आहेत. यात पती-पत्नी, एक मुलगा आणि मुलीला दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलं आहे. तर, गोळीबार केलेला आवाजही येत आहे. या कुटुंबातील एका मुलीला दहशतवाद्यांनी कुटुंबासमोर फाशी दिली आहे. यामुळे तिचा भाऊ आणि बहीण रडताना दिसत असून, दहशतवादी ‘ती स्वर्गात गेली’ असं म्हणत आहे.

हेही वाचा : “मला मारू नका”; इस्रायली विद्यार्थिनीचं हमासकडून अपहरण, थरकाप उडवणारा VIDEO

“तिनं जिवंत राहावं, असं मला वाटत होतं”, असे भाऊ रडत-रडत म्हणतोय. तर, “ती परत येऊ शकत नाही का?” अशी बहीण विचारते. यावर दहशतवादी ओरडून म्हणतो की, “शांत बसा… आता ती स्वर्गात गेली आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानतंर आई मुलांना जवळ घेते आणि म्हणते, “आता दुसरा जीव गमावणं मला परवडणार नाही.” ‘हिंदुस्तान टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलं आहे.